ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन शुक्ल दशमी. शिशिर ऋतू.
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज चांगला दिवस आहे”
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- महत्वाची कामे सकाळी पूर्ण करा. आर्थिक आवक चांगली होईल. आरोग्य संभाळा. सूर्य उपासना लाभदायक ठरेल.
वृषभ:- काळकरणा यश मिळेल. नवनवीन कल्पना सुचतील. संधीचे सोने करा. घाईने निर्णय घेऊ नका. अधिकारात वाढ होईल.
मिथुन:- वादविवाद होऊ शकतात. सहकारी मदत करणार नाहीत. शेजाऱ्यांशी वाद नकोत. स्पर्धेत यश मिळेल.
कर्क:- आज नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चात टाकणारा दिवस आहे. मात्र योग्य कामासाठी खर्च होईल. व्यसने नकोत.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. कार्य सिद्धीस जाईल. उत्साह वाढेल. जबाबदारी वाढेल. वरिष्ठ खुश होतील.
कन्या:- व्यवसायाच्या ठिकाणी कुरबुरी होतील. अंदाज चुकू शकतात. काळजी घ्या. योग्य नियोजन करा.
तुळ:- अयोग्य धाडस नको संयम आणि सबुरी आवश्यक आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. उच्च शिक्षणात अडथळे संभवतात.
वृश्चिक:- तांत्रिक काम करताना काळजी घ्या. वाहने जपून चालवा. व्यसने टाळा. घरात बदल कराल.
धनु:- गुंतवणूक जपून करा. तीव्र स्पर्धा जाणवेल. छुपे विरोधक डोके वर काढतील. नोकरांपासून धोका संभवतो.
मकर:- जोडीदार खुश राहतील. भागीदारी व्ययवसायत यश मिळेल. उत्तम आर्थिक लाभ होतील. आगेकूच सुरूच राहील. मान सन्मान मिळतील.
कुंभ:- वेगळे मार्ग निवडाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. स्पर्धेत यश मिळेल. गुंतवणूक नफा देऊन जाईल.
मीन:- कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारीचे काम करावे लागेल. धावपळ वाढेल. दगदग होईल. आईकडून लाभ मिळतील.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)