आजचे राशिभविष्य रविवार, १ मे २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल प्रतिपदा, वसंत ऋतू,
राहुकाळ – दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
“आज  चांगला दिवस आहे”
नक्षत्र: भरणी (रात्री १०.१० पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक धनलाभ होईल.अकल्पित घटना घडतील. मेहनतीच्या मानाने कमी फळ मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्चात वाढ होवू शकते. एखादा अनपेक्षित प्रसंग उभं राहील. आवडत्या देवतेचे नाम स्मरण करावे.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम लाभ होतील. मन प्रसन्न राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळतील. एखादा दुखवलेला सहकारी मित्र बनेल. बढती मिळू शकेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रवासाचे बेत काहीसे पुढे ढकलावे लागतील. उच्च शिक्षणात अडथळे येतील. मात्र काहीतरी नवीन मार्ग निघेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनपेक्षित कारणाने विश्र्नाती घ्यावी लागेल. आरोग्य सांभाळा.अग्नी पासून काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) गृहसौख्य लाभेल. जोडीदाराकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. विवाह इच्छुकांना काहीशी वाट बघावी लागेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभासाठी चांगला कालावधी आहे. मेहनत वाढवावी लागेल. कमी बोलणे हिताचे आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) शेअर्स मधून लाभ संभवतात. गुंतवणूक करण्यास चांगला कालावधी आहे. संतती कडून शुभ समाचार समजतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वाहन सुख लाभेल. शेतीची कामे पुढे सरकतील. पशु खरेदीस चांगला दिवस आहे.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक वृद्धी होईल. प्रसन्न वाटेल. रहस्य कथा लेखकास चांगला दिवस आहे.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) कलाकारांना उत्तम यश मिळेल. वक्तृत्व गाजेल. शब्दास मान मिळेल.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.