आजचे राशिभविष्य गुरूवार, १३ एप्रिल २०२३   

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण अष्टमी. वसंत ऋतू. शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० 
“आज चांगला दिवस आहे.” कालाष्टमी. 

आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु/मकर.
चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा (सकाळी १०.४३ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) घरातील जेष्ठ व्यक्तीची चिंता लागून राहील. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. मात्र एखादी सुखाची झुळूक अनुभवास येईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. आर्थिक तोशीस लागेल. उत्तरार्ध अनुकूल आहे.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) महत्वाची कामे पूर्वार्धात पूर्ण करा. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करतांना काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) सुरुवातीला आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. नातेवाईकांशी वादविवाद टाळा. उत्तरार्ध शत्रूपिडा वाढवणारा आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक संकट येऊ शकते. संततीच्या आरोग्याची काळजी वाटेल. स्त्री धन मात्र वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)  घरा शेजारी राहणाऱ्यांशी वाद संभवतो. शत्रू डोके वर काढतील. जोडीदाराला समजून घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  आर्थिक वृद्धी होईल. सकाळचा वेळ अनुकूल आहे. स्पर्धेत यश मिळेल. यशस्वी व्हाल.
वृश्चिक:– (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक गुंतवणूक करताना अधिक काळजी घ्या. प्रेमात यश मिळेल. मात्र घाई नको. विद्यार्थ्यांना कठीण काळ आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मन विश्र्नाती कडे ओढ घेईल. मनस्वास्थ्य फारसे चांगले राहणार नाही. शासकीय कामात अडथळे येतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात संथ असणार आहे. खर्चात वाढ होईल. पशूलाभ होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. पूर्वार्धात कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. पण मेहनत जास्त करावी लागेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)  उत्तरार्ध अनुकूल आहे. प्रतिष्ठा पणास लागेल. अनामिक भीती दाटून येईल. कुलदेवतेची उपासना करा.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!