ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
चैत्र कृष्ण एकादशी/द्वादशी. ग्रीष्म ऋतू. उत्तरायण. विश्वावसु नाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस आहे.” *वरूथीनि एकादशी* श्री. वल्लभचार्य जयंती.
चंद्र नक्षत्र – शततारका (राहू)/ (सकाळी १०.४९ नंतर) पू. भा.(गुरू)
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- चंद्र केंद्र गुरू आहे. अनुकूल चंद्र आहे. प्रापंचिक सुख मिळेल. उत्तम सहकार्य लाभेल. सखोल संशोधन कराल.
वृषभ:- मन आनंदी राहील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत कामाचा जोर वाढेल. मनासारख्या घटना घडतील.
मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे. पालकांची पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. अनुकूल गुरू मदत करेल.
सिंह:- आत्मविश्वास वाढलेला आहे. कर्तृत्व दाखवल्यास आज यश मिळेल. भागीदारीत वादविवाद टाळा. कायदेशीर सल्ला घ्या.
कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. प्रवास टाळा.
तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. प्रवास कार्यसाधक होतील. गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे मात्र योग्य सल्ला घ्या.
वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. हरवलेली वस्तू सापडेल.
धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. एखादी अप्रिय बातमी समजू शकेल.
मकर:- संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. राजकीय क्षेत्रात वाटचाल कराल.
कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. सखोल संशोधन करण्यास उत्तम कालावधी आहे. घरगुती कामे कराल.
मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीतून मदत होईल. दानधर्म करावा.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
