ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ शुक्ल द्वादशी. शिशिर ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज १२.०० नंतर चांगला दिवस आहे” *भीष्म द्वादशी*
चंद्र नक्षत्र – आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- उत्तम आर्थिक घडी बसेल. अनपेक्षित घटना घडतील. ज्याची वाट बघत होतात ते साकार होईल. लेखकांनी काळजी घ्यावी.
वृषभ:- उत्तम खाणेपिणे होईल. कलाकारांना यश मिळेल. विनाकारण खर्च वाढेल. व्यसने नकोत.
मिथुन:– लाभदायक दिवस आहे. कामे मार्गी लागतील. जुने मित्र भेटतील. मेजवानी मिळेल.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. नोकरीच्या ठिकाणी विचित्र अनुभव येतील. भौतिक सुखात कमतरता येईल.
सिंह:- अनुकूलता वाढीस लागेल मनासारखी कामे होतील. दूरचे प्रवास घडतील.
कन्या:- सामाजिक स्तर वाढेल. मान सन्मान मिळतील. कार्यक्षमता वाढेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
तुळ:- बौद्धिक क्षमता वाढीस लागतील. शैक्षणिक वर्तुळात चमक दाखवाल. प्रवासात त्रास संभवतो.
वृश्चिक:– हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींकडून चांगला अनुभव येईल. आप्तकडून लाभ होतील.
धनु:- विरोधक डोके वर काढतील. कोर्ट कामात यश मिळेल. विवाह इच्छुकांना खुश खबर मिळेल.
मकर:- वास्तू संबधित कामे मार्गी लागतील. वाहन सुख लाभेल. शेत जमिनीची खरेदी होईल.
कुंभ:- निसर्गरम्य परिसरास भेट होईल. छोटे प्रवास घडतील. संततीबाबत शुभ समाचार समजतील.
मीन:- कलाकारांना यश मिळेल. विक्री व्यवसायात मोठे यश मिळेल. घरात कटकटी टाळा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
