पौष कृष्ण द्वितीया/तृतीया. हेमंत ऋतू उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज उत्तम दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – आश्लेषा/मघा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. कुटुंबाला वेळ द्या. संवाद साधा. सरकारी कामे रेंगाळतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनासारख्या घटना घडतील. शत्रू पराभूत होतील. आरोग्यदायक घटना घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभ होतील. कामे मार्गी लागतील. चिंता दूर होतील. प्रतिष्ठा सांभाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मनावर ताबा ठेवा. अधार्मिक कामे घडू देऊ नका. अन्नदान करा. सौख्य लाभेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) खर्च वाढू शकतो. आज धाडसी निर्णय घ्याल. जोडीदाराशी वाद होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्चात टाकणारा दिवस आहे. घरात दबदबा वाढेल. संततीशी वाद होऊ शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. उत्साह वाढेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) महत्वाच्या भेटीगाठी होतील. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास नकोत. वक्तृत्व चमकले.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक धनलाभाचे योग आहेत. गुंतवणूक कामी येईल. जेष्ठांचा आदर करा. भावंड नाराज होऊ देऊ नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. कामास गती मिळेल. प्रसन्न वाटेल. दबदबा वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन उदास राहील. प्रेमात संयम बाळगा. धाडसी निर्णय लाभदायक ठरतील. बदनामीची भीती आहे.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था, दे,दो,चा,ची) कामात विघ्ने येतील. आर्थिक आवक कमी होईल. संयम आवश्यक आहे.