आजचे राशिभविष्य गुरूवार, ५ जानेवारी २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
पौष शुक्ल चतुर्दशी, हेमंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३००
“आज उत्तम दिवस आहे”
चंद्र नक्षत्र: मृग
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) यशस्वी दिवस आहे. व्यवसायात वाढ होईल. कठोर भूमिका घ्याल. तुमचे वेगळे रूप दिसेल. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शब्द देताना काळजी घ्या. अति आत्मविश्वास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कर्जासाठी जामीन राहू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आत्मविश्वास वाढेल. मेजवानीचे योग येतील. उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. दानधर्म करा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रतिकूल कालावधी आहे. काळजी घ्या. आशादायक प्रगती कराल. व्यसने नकोत. उधारी बुडण्याची शक्यता आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. जबाबदारी वाढेल. यश मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. व्यवसायात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अनुकूलता जाणवेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) परदेशात जाण्याचे योग येतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. शेअर्समध्ये लाभ होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूलता नसली तरी नुकसान होणार नाहीये. पत्नीकडून लाभ होतील. मोलाचा सल्ला मिळेल. नात्यातून मदत मिळेल .
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) जोडीदाराकडून मदत मिळेल. प्रेमात यश मिळेल. खुश खबर समजणार आहे. आर्थिक प्रगती होईल. राहत्या जागे जवळ मान सन्मान मिळतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यवसायात यश मिळेल. आर्थिक प्रगती होत राहील. विरोधक पराभूत होतील. राजकीय यश मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) शत्रूपिडा जाणवेल. स्पर्धेत अधिक मेहनत करावी लागेल. यश मिळेल धाडसी निर्णय घ्याल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) खर्चात वाढ संभवते. कामात अडथळे येतील. महत्वाचे करार आज नकोत. घरात काही बदल संभवतात.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.