ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल एकादशी. ग्रीष्म ऋतू, शोभन नाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे. *शयनी एकादशी* आहे.
चंद्र स्वाती’ नक्षत्रात आहे. आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- संमिश्र दिवस आहे. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. गृहकलह टाळा.
वृषभ:-नोकरीत चांगले अनुभव येतील. आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक कार्यात अधिक लक्ष घाला.
मिथुन:-छोटे प्रवास घडतील. संतती साठी खर्च कराल. धाडसी निर्णय घ्याल. अनपेक्षित घटना घडतील.
कर्क:-सरकारी कामातून यश लाभेल मात्र सचोटी सोडू नका. नोकरीत त्रास जाणवेल.
सिंह:-शत्रू पराभूत होतील. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात. प्रवासात त्रास. अनपेक्षित नुकसान संभवते.
कन्या:आर्थिक आवक चांगली राहील. कनिष्ठ मदत करतील. गूढ आणि तत्वज्ञानाची आवड निर्माण होईल.
तुळ:- मन अस्वस्थ राहील. नोकरीत ताणतणाव वाढेल. पत्नीशी मतभेद संभवतात. भागीदारी व्यवसायात नुकसान.
वृश्चिक:-प्रतिकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. आराम करा.
धनु:- संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. सामाजिक समर्थन प्राप्त होईल.संततीशी मतभेद संभवतात.
मकर:-राजकारणात त्रास जाणवेल. शत्रू डोके वर काढतील. नोकरीत कटकटी होऊ शकतात.
कुंभ:- नववा चंद्र तिसऱ्या गुरू आणि हर्षलशी प्रतियोग करत आहे.लेखकांनी काळजी घ्यावी. मोजके बोलावे. शनी – रवी शुभ योग आनंद निर्माण करेल.
मीन:-गृहसौख्य कमतरता जाणवेल. आर्थिक बाजू जरा कमी पडेल. सामाजिक क्षेत्रात दबदबा वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
