आजचे राशिभविष्य गुरूवार,२५ मे २०२३

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
जेष्ठ शुक्ल षष्ठी.ग्रीष्म ऋतू.शोभन नाम संवत्सर. 
राहुकाळ -दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज चांगला दिवस, *गुरुपुष्यामृत*(सूर्योदयापासून संध्याकाळी ७.५३ पर्यंत)” 
चंद्र नक्षत्र -पुष्य. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)आज एखादा चुकीचा निर्णय होऊ शकतो.बोलताना काळजी घ्या.कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)आर्थिक प्रगती होईल.इतरांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे.खरेदी करताना काळजी घ्या.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)उत्तम वक्तृत्व लाभेल.मौल्यवान खरेदी होईल. खुश राहाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)उत्साही वाटेल.आत्मविश्वास वाढेल.नोकरीत कटकटी टाळा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रवासात त्रास संभवतो.इलेव्हीट्रॉनिक वस्तू सांभाळा.बोलण्यातून मने दुखवू नका.
कन्या:-(टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे.काही सुखद अनुभव येतील.प्रवासात काळजी घ्या.वाहन जपून चालवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) राजकारणात अपयश येऊ शकते. कोर्ट कामे आज नकोत.पत्नीशी वावविवाद संभवतात.शत्रू त्रास जाणवेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उच्च शिक्षणात आज निराश पदरी पडेल.दूरच्या प्रवासाचे बेत लांबणीवर पडतील.आरोग्य सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कष्टाशिवाय यश मिळणार नाही.आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.मन अस्वस्थ राहील.शेअर्स मध्ये अंदाज चुकतील.
मकर:-(भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) घरासंबंधीत कामातून पत्नीशी वाद संभवतात.वाहांची दुरुस्ती आणि देखभाल यांची काळजी घ्या.शत्रू त्रास जाणवेल.
कुंभ:-(गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) धावपळ वाढेल.आर्थिक लाभ होतील.मात्र दगदग वाढेल.लेखकांनी सावधानता बाळगावी.
मीन:-(दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) विनाकारण शब्दांची उधळण टाळा. प्रेम प्रकरणात अपयश येऊ शकते.अति धाडस नको.

( कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव”या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!