ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००
“आज सकाळी १० नंतर चांगला दिवस आहे”
चंद्र नक्षत्र – मृग/आर्द्रा
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. अनपेक्षित घटना घडतील.
वृषभ:- शब्दास मान मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. योग्य सल्ला घेऊन आर्थिक नियोजन करा. मोजके बोला.
मिथुन:- विचारांची दिशा बदलेल. नवनवीन कल्पना सुचतील. वरिष्ठ अधिक जबाबदारी देतील. कामाची दिशा बदलेल.
कर्क:- संमिश्र ग्रहमान आहे. खर्चात वाढ संभवते. कामाच्या ठिकाणी वादविवादाचे प्रसंग येतील.
सिंह:- ग्रहमान अनुकूल आहे. सौख्य लाभेल. मन:शांती मिळेल. प्रवासात अडथळे येतील.
कन्या:- शत्रू पराभूत होतील. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. वाहन सुख मिळेल.
तुळ:-प्रवास घडेल. शुभ समाचार समजतील. प्रिय जनांचा सहवास लाभेल.
वृश्चिक:-संमिश्र दिवस आहे. कामाची दगदग वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. वास्तू संबधित कामे मार्गी लागतील.
धनु:- प्रिय व्यक्तींची भेट होईल. मत्सर त्रास जाणवेल. शत्रू पराभूत होतील.
मकर:- प्रगतीचा दिवस आहे. मन प्रसन्न राहील. राजकीय अंदाज अचूक ठरतील.
कुंभ:-संमिश्र ग्रहमान आहे. उपासना करण्यास उत्तम कालावधी आहे. अध्यात्मिक उन्नती होईल. नात्यात वाद होऊ शकतात.
मीन:- शेतीची कामे मार्गी लागतील. पशु खरेदी होईल. गैरसमज दूर करा. संयम बाळगा.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
