आजचे राशिभविष्य मंगळवार,२२ एप्रिल २०२५ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहू काळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
चैत्र कृष्ण अष्टमी/नवमी. ग्रीष्म ऋतू. विश्वावसु नाम संवत्सर. 
चंद्र नक्षत्र – श्रवण/धनिष्ठा. 

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. 
“आज चांगला दिवस आहे.” 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)  

मेष:- चंद्राचा गुरुशी त्रिकोण (शुभ) योग आहे. नोकरीत चांगले अनुभव येतात. वरिष्ठ मदत करतील. मेजवानी मिळेल. संपत्ती वाढेल.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. भेटी गाठी होतील. मन प्रसन्न राहील. जुने मित्र भेटतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. उच्च दर्जाचे आध्यात्मिक लाभ होतील. इतरांना मदत कराल. दानधर्म घडेल.

कर्क:- दिवस अत्यंत अनुकूल आहे. या कालावधीत महत्वची कामे पूर्ण करून घ्या. बुद्धीचा योग्य वापर कराल. प्रगती साधाल.

सिंह:– नवनवीन संधी चालून येतील. आर्थिक लाभ होतील. भेटवस्तू मिळतील. मोठी झेप घ्याल. व्यवसाय वाढेल.

कन्या:- संतती कडून चांगली बातमी समजेल. शिक्षणात यश मिळेल. छोटी सहल घडेल. अधिकार वाढतील.

तुळ:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. नातेवाईक येतील. घरगुती समारंभ घडेल. समाज मान्यता मिळेल. श्री दत्तगुरूंची उपासना करा.

वृश्चिक:-  उत्तम व्यावसायिक यश लाभेल. भावंड भेटतील. खाण्या पिण्याची चंगळ राहील. जोडीदाराची साथ लाभेल.

धनु:-  अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळी आणि नात्यातून सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. भय कमी होईल.

मकर:- सर्वार्थाने प्रगती साधणारा दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक कार्यक्रमात भाग घ्याल.

कुंभ:- व्यय स्थानी चंद्र आहे. साचलेली कामे पूर्ण करा. येणाऱ्या अनुकूलतेसाठी तयारी करा. योग्य कारणासाठी खर्च होईल.

मीन:- उत्तम दिवस आहे. प्रगती साध्य कराल. आरोग्य सुधारेल. स्वप्ने साकार होतील. संभाव्य धोका टळेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!