आजचे राशिभविष्य मंगळवार,२९ एप्रिल २०२५

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
वैशाख शुक्ल द्वितीया. चंद्र वसंत ऋतू. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.  
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज संध्याकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे. *श्रीपरशुराम जयंती*
चंद्रनक्षत्र – कृतिका(सूर्य)/(संध्याकाळी ६.४७ नंतर) रोहिणी (चंद्र). 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521) 
 
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा मंगल, शुक्र,शनी, नेपच्यूनशी लाभ योग आहे. अनुकूल दिवस आहे. भौतुक सुखे प्राप्त होतील. संपत्ती वाढेल. विपुल धन धान्य होईल. खर्च वाढतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. अत्यंत अनुकूल दिवस आहे. सन्मान प्राप्त होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. महिलांकडून लाभ होतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. कामाच्या ठिकाणी अचानक लाभ होतील. वरिष्ठ खुश होतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. वाहन सुख लाभेल. सर्व प्रकारचे लाभ होतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. सासूरवाडीकडून लाभ होतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. प्रवास घडतील. प्रिय व्यक्तीसोबत वेळ व्यतीत कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. खर्च सुद्धा वाढेल. जुनाट व्याधीवर इलाज सापडेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. पत्नीसाठी वेळ द्यावा लागेल. गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. येणी वसूल होतील. जमीन व्यवहारातून लाभ होतील.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल.  विक्री क्षेत्रात प्रगती कराल. गुंतवणुकीतून फायदा होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील.  सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. कलाकारांना यश मिळेल. सर्वार्थाने चांगला दिवस आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायिक प्रगती भरघोस होईल. शत्रू पराभूत होतील. प्रणय रम्य दिवस आहे. भौतिक सुखे मिळतील. प्रसन्न वाटेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!