आजचे राशिभविष्य मंगळवार, २९ ऑगस्ट २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण शुक्ल त्रयोदशी.वर्षा ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज चांगला दिवस आहे” 
नक्षत्र – श्रवण. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) कामाच्या ठिकाणी संमिश्र अनुभव येतील.वास्तू आणि वाहन संबंधित काही निर्णय लांबतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) खर्च वाढेल मात्र तो योग्य कारणासाठी होईल. दानधर्म कराल. मौल्यवान दागिने सांभाळा.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) व्यसने टाळा. इतरांवर विसंबून राहू नका. आरोग्य सांभाळा. घशावर ताण येईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) प्रेमात अपयश येऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवाल. जोडीदाराचा सल्ला मानावा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. प्रवासात त्रास होऊ शकतो.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. उधारी टाळा. उपासना करा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  भलते धाडस नको. कमी बोलणे हिताचे आहे. क्रोध आवरा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभाचा दिवस आहे. धनप्राप्ती होईल. मात्र चोरीचे भय आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल. कुटुंबाला वेळ द्याल. संततीची काळजी वाटेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मनोबल वाढेल. नवीन कल्पना सुचतील. आडाखे अचूक येतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन अस्वस्थ राहील. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.विश्रांती घ्या. महत्वाची कामे आज नकोत.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) उत्तम दिवस आहे. प्रगती होईल. शक्यतो महत्वाची कामे आज पूर्ण करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!