आजचे राशिभविष्य मंगळवार,१ मार्च २०२२

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
माघ कृष्ण चतुर्दशी. शिशिर ऋतू.
राहूकाळ- दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
आज चंद्र ‘धनिष्ठा’ नक्षत्रात आहे. वर्ज्य दिवस आहे. *महाशिवरात्री* 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अनुकूल दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. दबदबा राहील. लाभ मिळण्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल. संयम बाळगा.
वृषभ:- कामाच्या ठिकाणी मान राहील. विरोधक नामोहरम होतील. मन प्रसन्न राहील. दिवसाचा उत्तरार्ध अधिक लाभाचा आहे.
मिथुन:- हितशत्रूंच्या कारवाया वाढतील. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची आज काळजी घ्या. आरोग्य जपा. सकाळच्या सत्रात धावपळ टाळा.
कर्क:- जोडीदाराशी समजून घ्या. संशयकल्लोळ टाळा. उत्तरार्धात वाहने जपून चालवा. आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवा.
सिंह:- जोडीदारासाठी खर्च कराल. प्रतिस्पर्धी आव्हान देतील. मात्र विजय तुमचाच होईल. आर्थिक वृद्धी चांगली होईल. संध्याकाळ विश्र्नातीची.
कन्या:- आर्थिक प्राप्तीसाठी अतिउत्तम दिवस आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. लाभदायक दिवस आहे. मात्र त्वरित लाभाची अपेक्षा करू नका.
तुळ:- शांतपणे वाटचाल करा .कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. मन शांत ठेवा. स्पर्धेत मात्र यश मिळेल. वास्तू संबंधित कामे रेंगाळतील.
वृश्चिक:- आर्थिक लाभ होतील. दीर्घकालीन गुंतवणूक करा. आरोग्याची चिंता निर्माण होईल. शत्रूत्रास जाणवेल. आज कमी बोलणे हिताचे आहे.
धनु:-  अनुकूल दिवस आहे. धनलाभ होणार आहे. आळस झटकून कामाला लागा. वक्तृत्व चमकेल. कुटुंबास वेळ द्याल. सकाळच्या वेळी धावपळ वाढेल.
मकर:- मन अस्वस्थ राहील. खर्चात वाढ होणार आहे. फार चिंता करू नका. ध्यान धारणा करा. कुलदेवतेची उपासना आवश्यक आहे. राजकीय निर्णय जपून घ्या.
कुंभ:- दिवसाचा पूर्वार्ध फारसा अनुकूल नाही. मात्र संध्याकाळी मेजवानी मिळेल. गुप्तशत्रूपासून दूर रहा. ध्यानधारणा करा. प्रवास टाळा.
मीन:- सकाळी महत्वाची कामे पूर्ण करा. संधी सोडू नका. उत्तरार्धात खर्चात वाढ होणार आहे. त्याची भरपाई नंतर होईल. क्रोध आवरा.
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.