ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण सप्तमी. शिशिर ऋतू. शुभकृत नाम संवत्सर, उत्तरायण.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज अनिष्ट दिवस *काळाष्टमी* ,
चंद्र नक्षत्र – अनुराधा/ज्येष्ठा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) मेहनत वाढवावी लागेल. व्यवसायात लक्ष घालावे लागेल. विक्री व्यवसायात यश मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) शुभ समाचार समजतील. संवादातून यश मिळेल. स्पर्धेत मागे राहू नका.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा, के, को, हा) उत्तम धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. दीर्घकालीन फायद्याचे करार होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामात अडथळे येतील. भ्रमंती घडेल. निर्णय घेताना काळजी घ्या. संध्याकाळ नंतर अनुकूलता वाढीस लागेल.
सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) शेतीची कामे मार्गी लागतील. आरोग्य सांभाळा. गृहकलह होऊ शकतात. वादविवाद टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. ऐश्वर्य लाभेल. घरात काही बदल संभवतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) खर्चात टाकणारा दिवस आहे. आर्थिक नियोजन चुकू शकते. महत्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन विचारात गढून जाईल. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते. विचारपूर्वक कृती करा. कलाकारांना यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दिवसाची सुरुवात संथ आहे. खर्चात वाढ होईल. प्रवासात हानी होऊ शकते.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मार्ग सापडतील. प्रश्न सुटतील. कामाचा वेग वाढेल. आनंदी व्हाल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र असला तरी सुखाचा दिवस आहे. अध्यात्मिक आनंद मिळेल. नवीन कामे मिळतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अचानक लाभाचा दिवस आहे. गुंतवणूक करा. अंदाज अचूक येतील. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
