आजचे राशिभविष्य मंगळवार,१२ सप्टेंबर २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
श्रावण कृष्ण त्रयोदशी. वर्षा  ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज वर्ज्य दिवस आहे” *भौमप्रदोष* 
नक्षत्र – अश्लेषा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कर्क.   
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) विनाकारण चिडचिड होईल. फसवणूक होऊ शकते. गृहकलह टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामान्य दिवस आहे. काही लाभदायक प्रसंग येतील. मोठे निर्णय आज नकोत.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभ होतील. मात्र ते पुरेसे नसतील. मेहनत वाढवावी लागेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या. सहकारी विशेष सहकार्य करणार नाहीत. व्यवसायात माफक यश मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस नाही. एखाद्या निर्णयाचा फटका बसू शकतो. काळजी घ्या.
कन्या:– (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. मात्र आरोग्याची काळजी घ्या. चुकीची औषध योजना होऊ शकते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  कामाचा ताण वाढेल. प्रवासात काळजी घ्या. विंचू काट्याचे भय आहे.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) ज्ञानपीपासा वाढेल. अभ्यास कराल. नवनवीन संशोधन घडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अंदाज चुकत. कामे रेंगाळतील. भ्रमित होऊ शकतात. काळजी घ्या.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संशय कल्लोळ टाळा. जोडीदाराला विश्वासात घ्या. नवीन करार आज नकोत.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अति महत्वाकांक्षा नको. धाडस अंगाशी येईल. लेखकांनी काळजी घ्यावी.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) गूढ विद्यांची गोडी लागेल. योग्य गुरूचा शोध घ्या. खाण्यावर बंधन आवश्यक आहे. घशाची काळजी घ्या.

( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!