
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
श्रावण शुक्ल त्रयोदशी. वर्षा ऋतू. शुभकृत नाम संवत्सर.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र ‘पूर्वाषाढा’ नक्षत्रात आहे. आज उत्तम दिवस, ‘प्रीती’ योग, घबाड सकाळी ९.४० ते दुपारी २.१६
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- अधिकारात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. आरोग्य मात्र सांभाळा.
वृषभ:-आध्यात्मिक लाभ होतील. व्यावसायिक अंदाज अचूक ठरतील. आप्तांकडून मदत मिळेल.
मिथुन:- शेअर्स मध्ये नुकसान संभवते. व्यसने टाळा. विश्रांती घ्या. महत्वाचे करार आज नकोत.
कर्क:-कठोर भूमिका घ्याल.विवाह इच्छुकांना वाट बघावी लागेल. उत्साह कमी होईल.
सिंह:- येणी वसूल होतील. शत्रू पराभूत होतील. स्पर्धेत मोठे यश मिळेल.
कन्या:- अनपेक्षित घटना घडतील. विनाकारण वादविवाद होतील. कामात अडथळे येतील.
तुळ:- अकस्मात लाभ होतील. गृह सौख्य लाभेल. विश्रांतीची गरज भासेल. वाहन जपून चालवा.
वृश्चिक:- दबदबा वाढेल. मन आनंदी राहील. शुभ घटना घडतील. उद्योग व्यवसायात मोठे यश मिळेल.
धनु:- कठोर बोलणे टाळा. प्रवासात त्रास संभवतो. कलाकारांना यश मिळेल.
मकर:- आत्मविश्वास वाढेल. काही मनासारख्या घटना घडतील. संततीकडून शुभ समाचार मिळेल.
कुंभ:- विनाकारण खर्चात टाकणारा दिवस आहे. आवडत्या गोष्टीवर पैसे खर्च होतील. एखादी खुश खबर मिळेल.
मीन:- उत्तम यश मिळेल. उत्साह वाढेल. अनपेक्षित घटना घडतील.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)



