ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
चैत्र शुक्ल द्वादशी. वसंत ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे.” घबाडसकाळी ९.३७ पर्यंत. विष्णूला दवणा वाहणे. गंड योग सकाळी ११.१४ पर्यंत. नंतर वृद्धी योग उद्या सकाळी ९.५१ पर्यंत.
चंद्र नक्षत्र – मघा (सकाळी ९.३७ पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भौतिक सुखात काहीशी कमी येईल. मात्र कामे मार्गी लागतील. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) वाहन सुखात कमतरता जाणवेल. घाई नको. आरोग्याची काळजी घ्या. हुरहूर वाटेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सुखाचा दिवस आहे. कामानिमित्त फिरावे लागेल. नवनवीन कापलना सुचतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) खर्चात वाढ संभवते. कुटुंबास वेळ द्याल. काही अकल्पित घटना घडतील. मेजवानी मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आर्थिक लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल. आप्त भेटतील. एखाद्या प्रसंगात अपेक्षाभंग घडू शकतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यसने टाळा. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. खर्चात वाढ संभवते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) लाभदायक दिवस आहे. आर्थिक प्राप्ती होईल. कामे मार्गी लागतील. प्रगती होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. सौख्य लाभेल. कामाचा ताण वाढेल. मौल्यवान वस्तू चोरी होण्याचे भय आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. मन शांत ठेवा. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जातील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) काळजीपूर्वक कामे करा. काही सुखद घटना घडतील. मात्र दगदग वाढेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) खर्चात वाढ संभवते. संशयकल्लोळ टाळा. अचानक जबाबदारी येऊन पडेल. नसत्या आमिषाला बळी पडू नका.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मन आनंदी राहील. उत्तम लाभ मिळतील. कामाला वेग येईल. येणी वसूल होतील.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)