ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख शुक्ल तृतीया. वसंत/ ग्रीष्म ऋतू. विश्वावसूनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
चंद्र नक्षत्र – रोहिणी/ (दुपारी ४.१८ नंतर) मृग.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ. (शोभन योग – शुभ)
“आज शुभ दिवस आहे. *अक्षय्य तृतीया, श्री. बसवेश्वर जयंती*
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)
मेष:- चंद्र लाभ बुध, चंद्र युती गुरू. वाहन खरेदी होईल. कामे मार्गी लागतील. वरिष्ठ खुश होतील. संपत्ती वाढेल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. सामाजिक कार्य कराल. नोकरीत चांगले अनुभव येतील. मेजवानी मिळेल. मन आनंदी राहील.
मिथुन:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. तरीही सुखद बातमी समजेल. आध्यत्मिक प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे. दानधर्म कराल. खर्च वाढतील.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. नवीन खरेदी होईल. अचानक लाभ होतील. मन आनंदी राहील. कार्य सिद्धीस जाईल.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. व्यवसाय वाढेल. वक्तृत्व चमकेल. नवीन खरेदी होईल. नोकरीत संमिश्र अनुभव येतील.
कन्या:- प्रवास घडतील. कामांना गती प्राप्त होईल. पूर्वजांची पुण्याई अनुभवास येईल. आरोग्य सांभाळावे लागेल.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. आध्यत्मिक लाभ होतील. दानधर्म कराल. सामाजिक कार्यातून नावलौकिक वाढेल.
वृश्चिक:- व्यावसायिक यश लाभेल. मित्रांकडून चांगले सहकार्य लाभेल. पत्नीची मोलाची साथ मिळेल. योग्य सल्ला मिळेल.
धनु:- संमिश्र ग्रहमान आहे. कामात सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक भरभराट होईल. साधन संपत्ती वाढेल.
मकर:- व्यवसाय वृद्धी होईल. उत्साह वाढेल. संततीकडून चांगली बातमी समजेल. व्यावसायिक प्रगती होईल. राजकीय यश मिळेल.
कुंभ:- तुमच्या राशीतील जमीन व्यवहारातून लाभ होतील. घरगुती कामे आज पूर्ण होतील. व्यवसायाचे नियोजन काटेकोरपणे करू शकाल.
मीन:- अनुकूल ग्रहमान आहे. लेखकांना उत्तम यश लाभेल. हाती घेतलेले काम पूर्ण होईल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. वाहन सौख्य लाभेल.
(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)
