आजचे राशिभविष्य बुधवार,२ ऑगस्ट २०२३ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
अधिक श्रावण कृष्ण प्रतिपदा.वर्षा ऋतू,दक्षिणायन,शोभन नाम संवत्सर. आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मकर. 
आज उत्तम दिवस आहे. 
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521) 

मेष:- संमिश्र दिवस आहे.वरिष्ठ नाराज होऊ शकतात.नोकरी/व्यवसायात काळजीपूर्वक काम करा.
वृषभ:- धार्मिक कामासाठी खर्च होईल.गृहकलह टाळा.पत्नीला विश्वासात घ्या. प्रवासात जोखीम घेऊ नका.
मिथुन:-प्रतिकूल दिवस आहे.शक्यतो महत्वाची कामे आज नकोत.आरोग्याची काळजी घ्या.
कर्क:-  नोकरी/ व्यवसायात विनाकारण त्रास संभवतो. संयमाने काम करा.शब्द देताना विचार करा.
सिंह:- आर्थिक लाभ होतील.अंतर अपेक्षित यश मिळणार नाही.घशाचा त्रास जाणवेल.प्रवासात काळजी घ्या.
कन्या:- विनाकारण कोणतेही धाडस करू नका.गुंतवणूक करताना अधिक काळजी घ्या.आर्थिक नियोजन चुकेल.
तुळ:- पत्नीशी मतभेद संभवतात.भागीदारी व्यवसायातून फसवणूक होऊ शकते.काही सुखद क्षण अनुभवास येतील.
वृश्चिक:- नात्यातून त्रास संभवतो.अफवांचे बळी होऊ नका. भिन्न लिंगी व्यक्तीकडून खोटे आरोप होऊ शकतात.
धनु:- संतती कडून अपेक्षा भंग होऊ शकतो. संवाद वाढवणे आवश्यक आहे. प्रेमात फसवणूक.मौल्यवान वस्तू सांभाळा.
मकर:- अनपेक्षितपणे पाहुणे येऊ शकतात.घराचे प्रश्न प्रलंबित राहतील.मानसिक आरोग्य सांभाळा.
कुंभ:- प्रतिकूल दिवस आहे.महत्वाची कामे आज नकोत.लेखकांनी काळजी घ्यावी.उजव्या हाताचे दुखणे वाढू शकते.प्रिय व्यक्ती नाराज होईल.
मीन:- अनुकूल दिवस आहे.काही सुखद अनुभव येतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.

( कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)  

 

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!