ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
अधिक श्रावण कृष्ण नवमी.वर्षा ऋतू.
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज वर्ज्य दिवस”
नक्षत्र – कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी- मेष/वृषभ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभदायक दिवस आहे. कामानिमित्त भ्रमंती होईल. घराशेजारी विनाकारण वादविवाद टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. पशु लाभ होईल. नोकरीत काहीसे तणावाचे प्रसंग येऊ शकतात.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. लेखकांना यश लाभेल. कर्जे मंजूर होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम दिवस आहे. घरातील जेष्ठ व्यक्तींचा सन्मान करा. नोकरी/व्यवसायात प्रगती होईल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूर देशी जाण्याचे स्वप्न पूर्ण होईल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र प्रवासात काळजी घ्या. व्यसने टाळा.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) पती/पत्नीकडून लाभ होतील. योग्य सल्ला मिळेल. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात त्रास संभवतो. शिक्षणात अडथळे येतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) भागीदारी व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराच्या नावावर व्यवसाय करा. कौटुंबीक मतभेद संभवतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)महत्वाची कामे आज पूर्ण करा. धनलाभ होतील. कामे मार्गी लागतील. मात्र अचानक एखादी समस्या निर्माण होऊ शकते.
मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मान मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सांभाळा. नवीन ओळखी होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) कौटुंबिक सौख्य लाभेल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. ध्यानधारणा करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) व्यवसायात वाढ होईल. नवीन कल्पना सुचतील. त्यातून भविष्यात लाभ होतील. प्रवासात त्रास होऊ शकतो.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
