ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ कृष्ण द्वितीया.ग्रीष्म ऋतू,दक्षिणायन,शोभन नाम संवत्सर.
राहुकाळ -दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज चंद्र श्रवण नक्षत्रात आहे.
आज जन्मलेल्या बाळाची राशी -मकर.
आज सकाळी ८.०० नंतर चांगला दिवस आहे.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:-नोकरीत काहीशी अस्वस्थता राहील. राजकीय क्षेत्रात अपयश येईल. वादग्रस्त लेखन टाळा.
वृषभ:-धार्मिक कामासाठी खर्च होईल. आध्यात्मिक लाभ होतील. प्रतिष्ठा सांभाळा.
मिथुन:-प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. शैक्षणिक कामास वेळ द्यावा लागेल. आत्मबळ वाढवा.
कर्क:- वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. मेहनत वाढवावी. आरोग्य आणि प्रतिष्ठा सांभाळावी लागेल.
सिंह:- उच्च शिक्षणात अडथळे येऊ शकतात. प्रवासात काळजी घ्या. सन्मानासाठी खर्च कराल.
कन्या:- धोकादायक गुंतवणूक टाळा. आर्थिक नियोजन काटेकोर करा. मुलांच्या नोकरी संदर्भात काहीशी चिंता वाटेल.
तुळ:- पत्नीशी जुळवून घ्या. भागीदारी व्यवसायात लक्ष घालावे लागेल. पित्याशी मतभेद संभवतात.
वृश्चिक:-व्यवसायात प्रगती होईल. मात्र आर्थिक बळ मिळण्यास काहीशी वाट बघावी लागेल. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात.
धनु:- कौटुंबिक सुखात कमतरता येऊ देऊ नका. संततीशी संवाद साधा. मोजके बोला.
मकर:-आत्मविश्वास वाढेल. मेजवानी मिळेल. घराचे प्रश्न प्रलंबित राहतील. मानसिक आरोग्य सांभाळा.
कुंभ:- मन अस्वस्थ राहू शकते. काही कामे होण्यास विलंब होईल. अप्रतिष्ठा होऊ देऊ नका.
मीन:-उत्तम दिवस आहे. गृहसौख्यात मात्र काहीशी कमतरता जाणवेल. सामाजिक असंतोषाला तोंड द्यावे लागेल.
(कुंडलीवरून करियर,लग्न,व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.”राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -8087520521)
