ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
भाद्रपद शुक्ल एकादशी/द्वादशी, दक्षिणायन, वर्षा ऋतू, शुभकृतनाम संवत्सर.
राहू काळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आज शुभ दिवस, *भागवत एकादशी, वामन जयंती* आहे. घबाड दुपारी ४.०० पर्यंत.
चंद्र नक्षत्र – उत्तराषाढा.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- तुमच्या शब्दास मान मिळेल. अधिकारात वाढ होईल. सामाजिक जबाबदारी पार पडेल. मात्र मोजके बोलणे हिताचे आहे.
वृषभ:- राजकीय पेचप्रसंग निर्माण होतील. मानसिक गोंधळ वाढेल. प्रवासात काळजी घ्या. काही सुखद घटना घडतील.
मिथुन:- अस्वस्थ करणारा दिवस आहे. काहीसा तणाव वाढेल. दगदग होईल. आध्यत्मिक लाभ होतील.
कर्क:- कामे मार्गी लागतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील.
सिंह:- विजयी दिवस आहे. उत्तम आर्थिक लाभ होतील. उत्साह वाढेल.
कन्या:- कामात अडथळे निर्माण होतील. मन अस्वस्थ राहील. संतती बाबतीत शुभ समाचार समजतील.
तुळ:- मानसिक सौख्य लाभेल. आनंदी राहाल. नवीन कल्पना सुचतील.
वृश्चिक:- सुखाचा कालावधी आहे. उत्साह वाढेल. आर्थिक घडी बसेल. यश मिळेल.
धनु:-खर्च वाढू शकतात. विनाकारण एखाद्या प्रकरणात मानसिक त्रास होऊ शकतो. काही सुखद समाचार मिळतील.
मकर:- काहीसा तणावपूर्ण दिवस आहे. मात्र संध्याकाळ आनंदात व्यतीत कराल.
कुंभ:- खर्चासाठी तयार राहा. प्रतिष्ठा सांभाळा. आरोग्य काळजी घ्या. आध्यत्मिक प्रगती होईल.
मीन:- सुखद दिवस आहे. संधीचे सोने कराल. धनलाभ होतील. नावलौकिक वाढेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)
