लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल २ रुपयांनी स्वस्त

0

नवी दिल्ली,दि, १५ मार्च २०२४ –लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त झाले आहे. निवडणुकीच्या वर्षात मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

याआधी राजस्थान सरकारनेही आपल्या पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाला भेट देण्याचे काम केंद्राने केले आहे. आज शुक्रवार (दि. १५) सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट केले की, “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती २ रुपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केली आहे.

दरम्यान गुजरातमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आणि राज्यातील इंधन दर यामध्ये मोठी तफावत असल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये पेट्रोल ९६.८१ रुपयांनी विकेले जाते तर डिझेल ९२.५७ रुपयांनी विकले जाते. तेच महाराष्ट्रात पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये आहे.आता महाराष्ट्रासह देशभरात पेट्रोल आणि डिझेल २ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

निवडणुकी नंतर पेट्रोल डिझेल चे दर वाढणार नाही याची हामी सरकार देणार का ?: माजी अर्थमंत्री पी चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला आणि ते म्हणाले की, आधी किमती वाढवल्या गेल्या आणि नंतर निवडणुकांच्या आधी ते कमी केले गेले.

चिदंबरम यांनी X वर पोस्ट केली, गेल्या आठवड्यात मी पत्रकार परिषदेत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील असे सांगितले होते. हे आज करण्यात आले. त्यांनी विचारले, निवडणुकीनंतर (भाजप पुन्हा सत्तेत आल्यास) भाव वाढणार नाहीत, असे सरकार म्हणेल का ?

माजी अर्थमंत्री म्हणाले की, भाजप सरकारने एलपीजी सिलेंडरची किंमत ७०० रुपयांनी वाढवली आणि नंतर निवडणुकीपूर्वी १०० रुपयांनी कमी केली.पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीतही असेच डावपेच वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.