नाशिक – नाशिकमधील ज्येष्ठ रंगकर्मी रवींद्र ढवळे यांनी लिहिलेल्या “सायक्लोरामा” या पुस्तकाचे प्रकाशन आज शनिवार दि. ११ जून रोजी सायंकाळी ६ वा. स्वगत हाॕल, कुसुमाग्रज स्मारक येथे मा. आमदार हेमंतराव टकले यांच्या शुभहस्ते होणार आहे.
नाशिकमधील ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार दत्ता पाटील व प्रसिध्द उद्योगपती व साहित्यिक लोकेश शेवडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते, मोहन साटम आणि संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे तसेच ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक प्रकाश अकोलकर हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
प्रकाशनानंतर त्याच ठिकाणी पुस्तक सवलतीच्या दरात उपलब्ध होईल तरी रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती रवींद्र ढवळे अमृत महोत्सव समितीतर्फे करण्यात येत आहे.