आजचे राशिभविष्य – शुक्रवार, १८ जुलै २०२५

2

✍️ ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Today’s Rashi Bhavishya Marathi)
🔯 चंद्र नक्षत्र – अश्विनी | शके १९४७ | संवत २०८१ | वर्षा ऋतू
👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष
🕥 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
📌 टीप: नावावरून राशी ठरवू नका. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” फेसबुक पेजला भेट द्या.

Today’s Rashi Bhavishya Marathi

♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आज तुमच्या राशीत चंद्र आहे. गुरूचा लाभयोग आहे. दिलेला शब्द पाळाल. कठोर निर्णय घ्याल. न्याय कराल. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.

♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
व्ययस्थानी चंद्र असल्याने थोडा सावध राहा. काही सुखद अनुभव येतील. अध्यात्मिक विचार येतील. दानधर्मात सहभाग घ्याल. अनावश्यक वाद आणि धाडस टाळा.

♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
अनुकूल दिवस. आर्थिक लाभ संभवतो. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. वाहन व ऐश्वर्य मिळेल. घराचे स्वप्न पूर्ण होईल. वेळेचा सदुपयोग करा.

♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन संधी चालून येतील. अन्नदान केल्याने लाभ होईल. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या.

♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
प्रगतीचा दिवस. शुभ बातमी मिळेल. प्रवास यशस्वी ठरतील. यशाच्या शिखरावर पोहोचाल. गुरूच्या कृपेने इच्छा पूर्ण होतील.

♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
संमिश्र दिवस. आर्थिक प्रगती होईल. घरगुती प्रश्न सुटतील. नोकरीच्या ठिकाणी समाधानदायक अनुभव येतील. मनासारखी बढती मिळू शकते.

♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
प्रेमात यश. मन प्रसन्न राहील. आर्थिक प्रगती आणि धार्मिक पर्यटनाची शक्यता. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद लाभतील. शत्रूंचा त्रास जाणवू शकतो.

♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संमिश्र दिवस. कुटुंबाकडे लक्ष द्या. आर्थिक नफा संभवतो. दिलेला शब्द पाळावा लागेल. अनैतिक मार्गाने मिळणारे उत्पन्न टाळा.

♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
महत्त्वाचे निर्णय घ्या. आर्थिक प्रगती होईल. शेअर्स व करारातून लाभ. कोर्टप्रकरणांमध्ये यश. पत्नीचा सल्ला उपयुक्त ठरेल.

♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
अनुकूल ग्रहमान. कौटुंबिक कामात वेळ जाईल. स्वप्नपूर्तीचा दिवस. कामाची गती वाढेल. आरोग्य सुधारेल.

♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
उद्योगात प्रगती. संततीकडून आनंददायक बातमी. विद्यार्थ्यांना यश. आर्थिक भरभराट. सर्व बाजूंनी समाधान.

♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
भ्रमंती होईल. योजनांमध्ये बदल संभवतो. कला क्षेत्रातून लाभ. सहकार्य मिळेल. जमीन व्यवहारातून फायदा. मालक-भाडेकरू वाद सुटतील.

 

📞 कुंडली विश्लेषण व वैयक्तिक सल्ल्यासाठी संपर्क करा:
🔮 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📱 8087520521
आजचा दिवस आनंदात जावो, शुभेच्छा! ✨

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!