आजचे राशिभविष्य – मंगळवार, २४ जून २०२५

२४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

🪔 ज्योतिषी – मंगेश पंचाक्षरी, नाशिक Today’s Rashi Bhavishya Marathi
🧘‍♂️ पंचांग माहिती
तिथी: ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी
चंद्र नक्षत्र: रोहिणी/मृग
सूर्याची स्थिती: दक्षिणायन
राहूकाळ: दुपारी ३:०० ते ४:३०
आजचा दिवस: वर्ज्य दिवस
आज जन्मलेल्या बाळाची राशी: वृषभ

🌟 आजचे राशिभविष्य + टिप्स(Today’s Rashi Bhavishya Marathi)

♈ मेष:
रवी-गुरू युतीमुळे कौटुंबिक सौख्य, आर्थिक वाढ आणि सकारात्मक निर्णयाची वेळ आहे.
टीप: घरात सायंकाळी गोड धूप लावा, मानसिक स्थैर्य वाढेल.

♉ वृषभ:
दिवस अनुकूल. आर्थिक लाभ, सामाजिक यश आणि आत्मविश्वास वाढेल.
टीप: नवस पूर्ण असल्यास गोड दान करा – नवा लाभ मिळेल.

♊ मिथुन:
ग्रहस्थिती संमिश्र. खर्च वाढेल पण दानधर्म शुभ ठरेल.
टीप: घरात तांदूळ किंवा गहू दान करावे, नकारात्मकता दूर होईल.

♋ कर्क:
चंद्र लाभस्थानी. आनंद, खरेदी, स्वप्नपूर्तीचे संकेत.
टीप: नवीन वस्त्र खरेदीस योग्य दिवस. आज पांढरा रंग शुभ.

♌ सिंह:
नोकरी/व्यवसायात उत्तम यश. मान-सन्मान, नवे अनुभव.
टीप: घराबाहेर निघताना गोड काहीतरी खा – यश मिळेल.

♍ कन्या:
दबदबा वाढणार. सरकारी कामात यश, आर्थिक संधी निर्माण होतील.
टीप: महादेवाची अर्चना करा, प्रवास शुभदायक ठरेल.

♎ तुळ:
गूढतेकडे ओढ. धार्मिक कार्यात सहभाग, संपत्ती लाभ.
टीप: गंगेचे पाणी घरात शिंपडा, शांतता आणि समाधान मिळेल.

♏ वृश्चिक:
व्यावसायिक यश. मित्र, जोडीदाराकडून सहकार्य.
टीप: घरात लवंग-हळद युक्त धूप करा – मनःशांती मिळेल.

♐ धनु:
शुभ ग्रहमान. आर्थिक भरभराट, यशस्वी कार्यसिद्धी.
टीप: सायंकाळी देवघरात तुपाचा दिवा लावा – इच्छापूर्ती होईल.

♑ मकर:
प्रगतीचा दिवस. शेअर्समध्ये लाभ, पण जोखमीपासून सावध राहा.
टीप: शनिश्रयणी काळजीपूर्वक पार करा. काळ्या वस्त्राचे दान करा.

♒ कुंभ:
घरगुती सौख्य. संततीचे सहकार्य व शिक्षणात यश.
टीप: आईचा आशीर्वाद घ्या आणि पांढऱ्या फुलांनी पूजन करा.

♓ मीन:
उत्साहवर्धक दिवस. आर्थिक लाभ, सामाजिक कार्यातून समाधान.
टीप: एखाद्या वृद्धाला मदत करा, शुभफल अनेकपटींनी वाढेल.

२४ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

तुमच्यावर शुक्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती आणि कलाकार असतात. तुमच्या कलेतून तुमचे आर्थिक प्राप्ती होते. समाजात येणे जाणे असते. नवीन योजना राबवण्याची घाई होते. मित्रांबद्दल प्रेम असते. श्रीमंत जोडीदार मिळतो आणि लग्नानंतर भाग्योदय होतो. तुम्ही कायदाप्रेमी आहात. पाण्याजवळ भाग्योदय होतो. तुमच्यात कर्तृत्व आहेमात्र काही विलक्षण घटना आयुष्यत घडतात. वयाच्या 34 व्या वर्षी उत्कर्ष होतो. स्वतंत्र विचार असल्याने प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हातात असावी असे तुम्हाला वाटते. अंतर्गत आवाजाची तुम्हाला देणगी आहे. तुमचे असणे इतरांना आवडते. तुम्ही इतरांना सहजासहजी समजून येत नाहीत. रूढी, परंपरा यांची बंधने तुम्ही पाळत नाहीत. स्वतःबद्दल तुम्हाला कमालीचा आत्मविश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेतात. तुम्ही बोलण्यामध्ये अत्यंत चलाख आहात. जीवनात तुम्हाला चांगला मान सन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक जाते. तुमचे कपडे उच्च दर्जाचे असतात. आणि तुम्ही सुगंधी द्रव्य वापरतात. तुमचा स्वभाव संशयी आहे. उच्च वर्तुळात तुम्ही रमतात.

व्यवसाय:- संगीतकार, सराफ, व्यापार, हॉटेल मॅनेजमेंट, बेकरी, आर्किटेक्ट, मेडिकल दुकान, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- गुलाबी, निळा.
शुभ रत्न:- पाचू, मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

📌 विशेष सूचना:
तुमचा स्वभाव, भाग्योदय, आरोग्य, शुभ रत्ने, जीवनसाथीचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी कुंडली परीक्षण करून घ्या.
📞 संपर्क: ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] 👶 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष 🕥 राहुकाळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० (भारतीय […]

Don`t copy text!