राज्यात पाचव्या टप्यात अंदाजे ५७% मतदान :नाशिक मध्ये ६१% तर दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान
नाशिक,दिंडोरी लोकसभा मतदार संघाची प्राप्त आकडेवारी
नाशिक,दि ,२१ मे २०२४ – महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे.मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.अनेक दिगज्जाचे भविष्य Evm मध्ये बंद झाले असून राज्यात ५ वाजे पर्यंत सरासरी ४८.६६टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.सायंकाळी ६ च्या आत जे मतदान केंद्रच्या आत असतील त्यांना मतदान करता येईल असा नियम असल्याने काही मतदार संघात उशिरा पर्यंत मतदान सुरु असल्याने अद्याप अधिकृत आकडेवारी आली नसली तरी राज्यात सरासरी ५६ ते ५७ टक्के मतदान झाले असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे यांसह मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं. मुंबईत मतदारांनी उत्सपूर्त प्रतिसाद दिला. नाशिक लोकसभा मतदार संघात ६१ टक्के मतदान झाल्याची अनधिकृत आकडेवारी समोर आली आहे तर दिंडोरी मतदार संघात ६२.६६ टक्के मतदान झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी अधिकृत आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नाही .
मिळालेल्या माहिती नुसार नाशिक लोकसभा मतदार संघाची आकडेवारी
देवळाली – ६१ %
त्रंबक – ६६%
नाशिक मध्य – ५७%
नाशिक पूर्व- ५६%
नाशिक पश्चिम – ६०.%
सिन्नर – ६८.०० %
नाशिक एकूण मतदान ६१ %
दिंडोरी लोकसभा मतदार संघ
नांदगाव –५५.१%
कळवण – ६३.४५%
चांदवड – ६६.२%
येवला –६३. २%
निफाड –६२.७६%
दिंडोरी –६६ %
एकूण दिंडोरी लोकसभा मतदार संघ – ६२.६६%
काही ठिकाणी मतदारांना मतदानासाठी जास्त वेळ रांगेत उभं राहावं लागलं. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्याही घटना घडल्या. या घटनांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. या सर्व घडामोडींनंतर आता येत्या ४ जूनला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारवर नागरीक खूश आहेत की नाही? याचा निकाल याचा ४ जूनलाच कळणार आहे.