केरळमध्ये पर्यटकांची बोट उलटली : २१ जणांचा मृत्यू

0

मलप्पुरम,दि. ८ मे २०२३ – केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील तनूर भागातील थुवलाथिरम समुद्रकिनाऱ्याजवळ रविवारी संध्याकाळी पर्यटकांची एक बोट उलटली या मध्ये २१ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. बोटीत जवळपास ४० पर्यटक होते,एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले असून शोध मोहिम सुरू आहे.  या घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने किंवा लाँग विकेण्ड पकडून अनेकजण फिरायला गेले होते.महत्त्वाचे म्हणजे, ही दुर्घटना घडली, तेव्हा बोटीत जवळपास ४० पर्यटक होते, अशी माहिती केरळचे राज्यमंत्री वी.अब्दुर्रहमान यांनी दिली. यामुळे मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च पेटवून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओमध्ये सोशल मीडियावरुन समोर आले आहेत.

या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त करताना बोट दुर्घटनेत लोकांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना असं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अपघातातील लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.तसेच, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी ट्वीट करत केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.