नाशिक – एकटीने प्रवास करणे म्हणजे.माझ्यासाठी जीवन अनुभूती आहे,माझ्यासाठी जगणं शिकवणारी शाळा आहे त्यातून जीवन व्यवहार,संस्कृती ,कला,खाद्यसंस्कृती यांचं खर खुरेदर्शन आहे,माझ्या एकटीचा प्रवास म्हणजे एकटेपणा च्या संवादाचे साधन आहे त्यातून जगभरातील भाषा ,धर्म, तत्वज्ञान , वेद पुराण यांची जाणीव झाली तीच खरी जीवनप्रेरणा आहे. वडील हृदयनाथ मंगेशकर यांनी मला घडवले आत्मविश्वास दिला,माझ्यात धाडस निर्माण केले तीच माझी शिदोरी आहे त्याच्या बळावर माझा प्रवास आहे आणि स्वतःचा शोध आहे.आतला मनाचा प्रवास आहे. असे प्रतिपादन डॉ राधा मंगेशकर यांनी केले
गायनाबरोबरच लेखनातही तितकीच दर्जेदार मोहोर उमटवणार्या डॉ.राधा मंगेशकर यांच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘एकटीचा सफरनामा’ या पुस्तकाच्या निमित्ताने जाहीर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर डॉ. हरी कुलकर्णी व समन्वयक रूचिता ठाकूर हे डॉ. राधा मंगेशकर यांनी ही मुलाखत घेतली.
डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, गंगापूर रोड, येथे जाहीर मुलाखत संपन्न झाली.विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक, बाबाज् थिएटर्स, नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र, नाशिक, रेडिओ विश्वास 90.8 (कम्युनिटी रेडिओ) व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राधा मंगेशकर यांनी खजुराहो,अजिंठा ,रवींद्रनाथ टागोर यांचे शांतिनिकेतन,रवींद्र संगीत ,वास्तुशिल्प, मानवी स्वभाव,भाषा,व्यक्त होणे याविषयी अनुभव कथन केले,शिल्पे ही नवा विचार,आपली संस्कृती ,यांचा अर्थ उलगडून सांगतात.आणि आपल्या भवतालाच्या ,इतिहासाच्या खुणा सांगतात,आश्चर्य चकित करतात.संस्कृती किती वेगाने बदलत आहे, नवे संदर्भ जोडत आहे ,ते कुतूहलापोटी मी बघते असेही राधा मंगेशकर म्हणाल्या.
विश्वास ग्रुप चे कुटुंब प्रमुख विश्वास जयदेव ठाकूर स्वागत,प्रास्ताविक करताना म्हणाले की,प्रवास आपल्याला आयुष्याचा शोध घ्यायला सांगतो,विचारांच्या,भाव भावनांच्या जगण्याला समृध्द करतात व आपल्याकडे पाहायला शिकवतात ती गरज आहे व नवा आत्मशोध आहे.त्यासाठी निसर्गाशी नाते जोडावे,
राधा मंगेशकर यांचा परिचय विनायक रानडे यांनी केला,सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला.आभार विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी मानले,
सुत्रसंचलन बागेश्री पारनेरकर यांनी केले.यावेळी प्रशांत जुन्नरे,मधुकर झेंडे,डॉ.सुधीर संकलेचा,मिलिंद धटिगण,प्रशांत पाटील, ए.के चव्हाण, विजया लक्ष्मी मनेरिकर, डी जे हंसवाणी,जयप्रकाश जातेगावकर,प्रसाद पाटील,नंदकिशोर ठोंबरे,शिरीष रायरीकर,दिलीप साळवेकर, डॉ. स्मिता मालपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.