महाराष्ट्रातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरण;३५ जणांवर गुन्हे,१४ आरोपींना अटक,२१ फरार
ड्रग्ज प्रकरणात १० हजार पानी दोषारोपपत्र दाखल,पेडलर पुजारी,राजकीय कनेक्शन समोर येणार ?
तुळजापूर,दि,१५ एप्रिल २०२५ –महाराष्ट्रातील तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग तस्करीची मोठी चर्चा आहे .महाराष्ट्रातील सर्वात मोठे ड्रग्ज प्रकरणअसून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ३५ आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग तस्करी मध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलो होतं. त्यानंतर अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर आल्यानंतर आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून २१ आरोपी फरार आहेत.तर ८० जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली, ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल १३ पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले.
या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून अनेक उलगडे होत आहेत. लाखो भाविकांच्या तुळजापुरात ड्रग तस्करीमध्ये पुजारीच पेडलर असल्याचं समोर आलं होतं.दरम्यानआता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात दोषआरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तब्बल १० हजार पानांचे दोषआरोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाले आहे.तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात ३५ आरोपी असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी २०२५ ला तुळजापूर तालुक्यात २.५ लाख रुपये किमतीच्या ५९ पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली.एमडी ड्रग जप्त करण्यात आले होते.
तपासादरम्यान,ड्रग्स विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली, जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते.पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली, ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे ५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले.
तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचे समोर आले, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक करण्यात यश आले. या दरम्यान, तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी १० आरोपींची नावे समोर आली, ज्यामुळे फरार आरोपींची संख्या २१ वर पोहोचली आहे .