टी व्ही एस एंटॉर्क मान्सून स्कुटर रॅलीच्या फोटो स्पर्धेचे निकाल जाहीर

राजू ठाकरे प्रथम ( दै लोकमत ) ,अशोक गवळी द्वितीय ( दै दिव्य मराठी ) तर  सचिन निरंतर तृतीय ( सकाळ )

0

राजू ठाकरे प्रथम (दै लोकमत),अशोक गवळी द्वितीय(दै दिव्य मराठी)तर सचिन निरंतर तृतीय(सकाळ)

नाशिक (  प्रतिनिधी ) नुकतीच विल्होळी जवळील सारूळ गावात नासा आयोजित टी व्ही एस एंटॉर्क मान्सून स्कुटर रॅली संपन्न झाली .या रॅली चा थरार टिपणाऱ्या छायाचित्रकारांसाठी सुद्धा विशेष फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या छायाचित्र स्पर्धेत राजू ठाकरे प्रथम ( दै लोकमत ) ,अशोक गवळी द्वितीय ( दै दिव्य मराठी ) तर  सचिन निरंतर तृतीय ( सकाळ )  क्रमांक मिळालेला आहे .

अनुक्रमे तीन हजार , दोन हजार व एक हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे या बक्षिसाचे स्वरूप होते . नुकत्याच हॉटेल एस एस के येथे एका छोटेखानी कार्यक्रमात या बक्षिसाचे वितरण हॉटेल चे संचालक शैलेश कुटे यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख सुरज कुटे व नासा चे निलेश ठाकरे उपस्थित होते .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.