“नासा” तर्फे टीव्हीएस एंटॉर्क नासा मान्सून स्कूटर रॅलीचे आयोजन

स्पर्धेदरम्यान छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन

0

नाशिक ( प्रतिनिधी ) – नासिक ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन ( नासा ) तर्फे शनिवार दि १७ सप्टेंबर २०२२ रोजी ‘ टीव्हीएस एंटॉर्क ‘ नासा मान्सून स्कूटर रॅली ऑफ नासिक २०२२ या पावसाळी स्कूटर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.नासा चे दिवंगत अध्यक्ष कै. भास्कर पटवर्धन  यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणारी हि स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया ( एफ एम एस सी आय ) या भारत सरकारच्या मान्यताप्राप्त शिखर संस्थेच्या निकषानुसार होणार आहे .

प्रत्यक्ष स्पर्धा आयोजनात बऱ्याच मोठ्या विश्रांती नंतर व “नासा” च्या नवोदित व उत्साही संचालकांनी सूत्र हातात घेतल्यावर सर्वप्रथम हि स्पर्धा आयोजित केली आहे . प्रख्यात दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटार कंपनी चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेली हि स्पर्धा नासिक येथील सारूळ गावातील दगडांच्या खाणीच्या परिसरात खेळवण्यात येणार आहे .

या स्पर्धेसाठी केव्हज काऊंटी रिसॉर्ट ,गोदा श्रद्धा फाउंडेशन , रेडिओ सिटी , मास्टर एनर्जी ड्रिंक्स इ. कडूनही प्रायोजकत्व लाभलेले आहे.दर्जेदार नियमाची प्रसिद्ध असलेल्या ” नासा ” ने हि स्पर्धा जाहीर करताच देशभरातील स्पर्धकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे . आज पर्यंत नाशिक , मुंबई , पुणे , नागपूर , भोपाळ , बेंगरूळ इ. ठिकाणच्या तब्बल २८ स्पर्धकांनी सहभाग निश्चित केला असून अजून १० ते व  प्रवेशिका मिळतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

एकूण सहा गटांमध्ये विभागून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत महिला गट सुद्धा असून कदाचित भारतात प्रथमच इलेट्रीक स्कूटर्सचाही एक गट असणार आहे . काईट एनर्जी प्रायव्हेट लि.  या संस्थेने मॅग्नम प्रो , मॅग्नम एक्स ,काईट एक्स वन या तीन इलेक्ट्रिक स्कूटर्स च्या प्रवेशिका दाखल केल्या आहे . या शिवाय अजून प्रवेशिका अपेक्षित आहेत .

प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना रोख पारितोषिकांसह करंडक व प्रशस्तीपत्र सुद्धा देण्यात येणार आहे . नवोदित स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रथमच सहभाग नोंदवणाऱ्या स्पर्धकांपैकी सर्वोत्तम वेळ नोंदवणाऱ्या स्पर्धकाला करंडक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.विल्होळी येथील केव्हज् काऊंटी रिसॉर्ट येथे शुक्रवारी १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी स्पर्धेत सहभागी असणाऱ्या वाहनांची तपासणी झाल्यावर समारंभपूर्वक सुरुवात करून स्पर्धकांना स्पर्धेचा मार्ग दाखवण्यात येणार आहे .

एफ.  एम.  एस.  सी.  आय.  चे निकष पाळले जात आहेत यावर देखरेखीसाठी अधिकारी म्हणून प्रशांत गडकरी , मनीष चिटको , सलील दातार यांची तर वाहन तपासनीस म्हणून रवींद्र वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

प्रत्यक्ष स्पर्धेला शनिवारी दि १७ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ९ वाजता  केव्हज् काऊंटी येथून सुरवात होईल . एकूण तीस किलोमीटर अंतरात १८ किलोमीटर अंतर हे स्पर्धात्मक असेल . स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा प्रमुख सुरज कुटे यांच्या बरोबर शमीम खान , अंकित गज्जर , व इतर सहकारी काम करत आहेत . अधिक माहितीसाठी सुरज कुटे ९४०४३५५५५५ ,किंवा अनिश नायरा ९८२३३१८३३७ यांच्या संपर्क साधावा अशी माहिती आयोजकांतर्फे आली आहे.

छायाचित्र स्पर्धा 
या स्पर्धेदरम्यान छायाचित्रकारांसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन केले आहे . दैनिकात छापून आलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रासाठी अनुक्रमे ३०००/- २०००/- व १०००/- रुपये रोख , स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत . या छायाचित्र स्पर्धेचे निकष पुढील प्रमाणे असणार आहे . दैनिकात छापून आलेल्या छायाचिरासाठीच हि स्पर्धा असणार आहे . फोटोमध्ये प्रायोजक , स्पर्धेतील थरार , तसेच पारितोषिक वितरण समारंभ यांचा समावेश असणे आवश्यक आहे . सर्व सहभागी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . या स्पर्धेसाठी छापून आलेले फोटो चे वृत्तपत्रातील कात्रण व ८ x १० आकारातील फोटो हॉटेल एस एस के येथे मंगळवार दि २० सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावयाची आहेत .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!