सिन्नर विधानसभा मतदार संघातील उदय सांगळे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

0

नाशिक,दि २२ऑक्टोबर २०२४ – सिन्नर विधानसभा मतदारसंघातील उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिन्नर विधानसभेची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या तोंडावरच उदय सांगळे शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील . जितेंद्र आव्हाड , गजानन शेलार यांच्या उपस्थितीत उदय सांगळे यांचा आज मुंबईत प्रवेश झाला.

सिन्नरमधून सांगळे यांच्या उमेदवारीला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरुवातीला विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्याकडे सांगळे यांच्या बाबत तक्रारही केली होती. मात्र, आता हा वाद मिटल्याची माहिती समोर येत आहे. उदय सांगळे यांचा सिन्नरमध्ये दांडगा जनसंपर्क आहे. ते विद्यमान आमदार कोकाटे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. त्यामुळे शरद पवारांकडून सांगळे यांनी तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.