उद्धव ठाकरेंचे ६५ उमेदवार रणांगणात ! पहिली यादी जाहीर
नाशिक जिल्ह्यातील ५ मतदार संघाचा समावेश : नाशिक मध्य मधून वसंत गीते तर पश्चिम मधून सुधाकर बडगुजर यांच्या नावावर शिक्का मोर्तब
मुंबई,दि, २३ ऑक्टोबर २०२४ –उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या ६५ उमेदवावारांची यादी जाहीर केली असून महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena) आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या या अधिकृत यादीत ६५ उमेदवारांचा समावेश आहे.यादी जाहीर होण्या पूर्वी, जवळपास ४० उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने संधी दिली आहे. तर बहुचर्चित नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून वसंत गीते आणि पश्चिम विधान सभा मतदार संघातून सुधाकर बडगुजर यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला आहे.
ठाण्यातील कोपरी पाच पाखडी या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत ६५ जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.मुंबईतील १३ मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाने १५ पैकी १४ आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
पहिल्या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने संधी
वरूण सरदेसाई
महेश सावंत
प्रवीणा मोरजकर
केदार दिघे
स्नेहल जगताप
समीर देसाई
सिद्धार्थ खरात
राजू शिंदे
या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची अधिकृत यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024