ठाकरे गटाची लोकसभेच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर
पहिल्या यादीत १७ उमेदवारांचा समावेश : नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना संधी
मुंबई,दि,२७ मार्च २०२४ –उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांनी लोकसभा निवणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली असून नाशिक लोकसभा मतदार संघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आली आहे. तर दक्षिण मुंबई मुधुन अरविंद सावंत तर ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.२२ जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे नेते,खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
संभाजीनगर हा उद्धव ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली जाणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार याबद्दल चर्चा होत्या.अखेर या मतदारसंघातील उमेदवाराचं नावाच्या चर्चेला पहिल्याच यादीत पूर्णविराम लावत उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर केली आहे.
जाहीर झालेल्या यादीमध्ये १६ नावं असली तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार,मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.असे एकूण १७ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
उमेदवारांची यादी
बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
सांगली -चंद्रहार पाटील
मावळ – संजोग वाघेरे
नाशिक- राजाभाऊ वाझे
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
हिंगोली -नागेश आष्टीकर
ईशान्य मुंबई- संजय दीना पाटील
रायगड – अनंत गिते
छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धारशीव- संजय देशमुख
परभणी- संजय जाधव
सिंधुदुर्ग – रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई – ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई – दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई – वायव्य- अमोल कीर्तिकर
मुंबई दक्षिण मध्य -श्री अनिल देसाई
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024