ब्रिटनमध्ये भीषण विमान अपघात :टेकऑफ नंतर विमानाला आग

0

लंडन,दि.१३ जुलै २०२५- UK plane crash अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या अपघातानंतर आता ब्रिटनमध्येही एक भीषण विमान अपघात घडला आहे. साउथेंड एअरपोर्ट येथून टेकऑफ केल्यानंतर काहीच वेळात Beechcraft B200 हे छोटं प्रवासी विमान आगीत सापडून धावपट्टीजवळ कोसळलं. हा अपघात ब्रिटन स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

विमान ब्रिटनमधून नेदरलँड्समधील लेलीस्टॅड शहराकडे जात होतं. मात्र टेकऑफनंतर काही मिनिटांतच विमानातून धूर आणि ज्वाळा बाहेर येताना दिसल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही क्षणातच संपूर्ण विमानाने पेट घेतला आणि धावपट्टीजवळ मोठा आवाज करत ते कोसळले.

अपघातानंतर हाहा:कार(UK plane crash)
विमान दुर्घटनेची माहिती मिळताच एसेक्स पोलिस, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं शर्थीचं प्रयत्न सुरू असून बचावकार्य सुरु आहे. अपघातावेळी विमानात किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर उठताना दिसतो. काही प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले की, “आम्ही एक मोठा स्फोटाचा आवाज ऐकला, आणि लगेचच आगीच्या ज्वाळा आकाशात उठताना पाहिल्या. लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि आरडाओरड सुरू झाली.”

विमानतळावर उड्डाणे थांबवली
या घटनेनंतर साउथेंड विमानतळावर सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. स्थानिक प्रशासनाने धावपट्टी बंद केल्याचं जाहीर केलं आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना आवश्यक नसलेला प्रवास टाळण्याचं आवाहन केलं आहे तसेच अधिकृत वेबसाईटवर अपडेट्स पाहण्यास सांगितले आहे.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या अपघातामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड किंवा इंजिन फेल्युअर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एसेक्स पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “घटनास्थळी आपत्कालीन सेवा कार्यरत आहेत, आणि आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.”

सध्या या अपघातामुळे ब्रिटनसह युरोपभरात मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत विमान सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रवासी आणि तांत्रिक बाबतीत अधिक दक्षता घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!