पेट्रोल डिझेल दरवाढीचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कडून अनोखा निषेध

0

नाशिक – कोरोनाचा प्रभाव आता कमी होतांना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर महाविद्यलाय सुरु करण्यात आली.परंतु देशात होणाऱ्या पेट्रोल डिझेल ची दरवाढ  सातत्याने होत आहे. ही दरवाढ  रोखण्यात यावी अशी मागणी करत आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात महविद्यालयीन विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत अनोख्या पद्धतीने पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला.

पेट्रोल डीझेलची सातत्त्याने होत असलेली दरवाढ रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज महाविद्यालय सुरु होण्याच्या मुहूर्तावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बैलगाडीच्या माध्यमातून महाविद्यालयात सोडत उपहासात्मक आंदोलन केले करण्यात आले आहे. केंद्र शासनाने ही पेट्रोल डीझेलची सातत्याने होणारी दरवाढ तातडीने रोखून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

यावेळी बोलतांना युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे म्हणाले की, गेल्या पंधरा दिवसात सातत्याने पेट्रोल डीझेलची दरवाढ कायम असून नाशिकमध्ये आज पेट्रोलचा ११२.४६ तर डीझेल १०१.६५ रुपयांवर पोहचले आहे. पेट्रोल डीझेलच्या दरवाढीचा परिणाम शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या कुटुंबाचे बजेट यामुळे संपूर्णपणे कोलमडून गेलेले आहे. याबाबत सातत्याने आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत मागणी करत आहोत. पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. तरी देखील पेट्रोल डीझेलची दरवाढ थांबत नसून सर्व सामान्य नागरिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी डॉ अमोल वाजे, जीवन रायते, पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळा निगळ, विभाग अध्यक्ष निलेश भंदुरे, विशाल डोके, रामदास मेदगे, समाधान तिवडे, राहुल कमानकर, जाणू नवले, नवराज रामराजे, निलेश सानप, राहुल पाठक, डॉ.संदीप चव्हाण, विशाल पगार, महेश शेळके, रेहान शेख, अक्षय पाटील, सिद्धांत काळे, दादा निगळ, शिवाजी मटाले  राजाराम पाटील निगळ, शुभम गांगुर्डे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.