unique upvas food Recipe आज पहिला श्रावणी सोमवार आपल्या जनस्थानच्या वाचकांसाठी या श्रावण महिन्यात खास उपवासाचे देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. पदार्थ बनवावा आणि बातमीच्या शेवटी कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवा
🔸 साहित्य (२ पराठ्यांसाठी)(unique upvas food Recipe)
राजगिऱ्याचे पीठ – १ कप
उकडलेला बटाटा – १ मध्यम आकाराचा (किसून घ्यावा)
हिरव्या मिरच्या – १ ते २ (बारीक चिरून)
सैंधव मीठ (सेंधा नमक) – चवीनुसार
जिरं (पूड किंवा सडसडीत) – ½ चमचा
लिंबाचा रस – ½ चमचा (ऐच्छिक)
कोथिंबीर – बारीक चिरून १ चमचा
साजूक तूप / शेंगदाण्याचे तेल – पराठे शेकण्यासाठी
थोडं पाणी किंवा दही – मळण्यासाठी
👩🍳 कृती:
मळणं:
एका मोठ्या बाऊलमध्ये राजगिऱ्याचे पीठ, किसलेला बटाटा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, लिंबाचा रस आणि मीठ टाका.
थोडं थोडं पाणी (किंवा दही) घालत सगळं नीट मिक्स करा.
पीठ सैल न होता थोडं घट्ट आणि मऊसर भिजवून घ्या. ५-१० मिनिटे झाकून ठेवा.
लाटणं:
गॅसवर तवा गरम करत ठेवा.
एका प्लास्टिक शीट किंवा पोळी लाटण्याच्या पत्र्यावर थोडं तूप लावून पीठाचा एक गोळा घेऊन हलक्या हाताने थापून पराठा तयार करा. (राजगिऱ्याचे पीठ चिकट नसल्यामुळे लाटण्यापेक्षा थापणे सोयीचे.)
खूप पातळ न करता मध्यम जाडीचा पराठा बनवा.
गरम तव्यावर पराठा टाका. दोन्ही बाजूंनी तूप लावून कुरकुरीत आणि खरपूस भाजा.
दोन्ही बाजू सोनेरी रंगाच्या झाल्या की पराठा तयार!
🍽️ कशाबरोबर खावं?
दही आणि उपवासासाठी बनवलेली शेंगदाण्याची चटणी
गोड दही / लोणी
साजूक तूपावर टाकलेली साखर (गोड आवडत असल्यास)
📌 उपयुक्त टीप:
बटाट्याऐवजी सुरण वापरूनही हेच पराठे बनवता येतात.
दह्यामुळे पराठे अधिक मऊ होतात.
थोडं तीखट हवं असल्यास मिरची बरोबर थोडं आलं किसून टाकावं.
दीपाली ओझरकर-राईकर ,नाशिक