अ.भा.म.साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी कवी प्रकाश होळकर यांची बिनविरोध निवड

साहित्य महामंडळाच्या इतिहासात प्रथमच नाशिक जिल्ह्याला मिळाला मान

0

सातारा – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सदस्यपदी नाशिकच्या लासलगाव येथील प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.सातारा येथील फलटणमध्ये सत्ताविसावे विभागीय साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले या संमेलनाला जोडूनच महाराष्ट्र साहित्य परिषदेची (पुणे) या आद्य संस्थेची बैठक कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार व इतर सदस्य या बैठकीस उपस्थित होते.सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या या बैठकीत कमी प्रकाश होळकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात येऊन होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले आहे. साहित्य महामंडळाच्या इतिहासात प्रथमच हा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे.

नाशिकला संपन्न झालेल्या संमेलनातील वाद-विवाद अजून सुरूच असले तरी तेव्हा कवी प्रकाश होळकर यांच्या निवडीने अधिक लक्ष वेधले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त पदी होळकर यांची अलीकडेच वर्णी लागली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निवडीबद्दल साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी प्रकाश होळकर यांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!