नाशिक ( प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाने आगामी नाशिक महानगरपालिका निवडणूक तयारी सुरू केली आहे.भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज भरून देण्याचे आवाहन केले आहे.नाशिक शहरातील सर्व ४४ प्रभागांतील १३३ जागांवर निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी स्वतःची संपुर्ण माहिती असलेला फॉर्म भरून द्यावा असे आवाहन भाजप नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी केले आहे. भाजपने वसंतस्मृती कार्यालयात इच्छुकांचे फॉर्म उपलब्ध केले असुन त्या त्या भागातील मंडल अध्यक्ष किंवा भाजप कार्यालायामधून इच्छुकांनी फॉर्म घेऊन भरून द्यावे असे आवाहन पालवे यांनी पत्रकान्वये केले आहे.
भारतीय जनता पक्षाची निवडणुकीत इच्छुकांची पुर्ण माहिती असलेला फॉर्म भरून घेण्याची नेहमीची पध्दत असुन त्यानुसार उमेदवारांबाबत इत्यंभूत माहिती घेतली जाते.त्यानंतर पक्ष सर्वे, उमेदवार सर्वे, सामाजीक समीकरण, इच्छुकांच्या मुलाखती अशा प्रकारे निवडणूक यंत्रणा राबविली जाते. त्यानुसार तयारीचा भाग म्हणून सर्वप्रथम इच्छुक असलेल्यांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे पालवे यांनी सांगितले. नाशिक महानगरात विद्यमान नगरसेवकांसह इतर अनेकांनी भाजपकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असुन अशा सर्वच इच्छुकांनी आपले फॉर्म भरून द्यावे असे आवाहन पालवे यांनी केले आहे.