मुंबई,दि.५ मे २०२५: Vaani Kapoor Raid 2 अभिनेत्री वाणी कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपट ‘रेड 2’ च्या जबरदस्त यशामुळे सातव्या आसमानावर आहे. अजय देवगणसोबत मुख्य भूमिकेत झळकलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत असून, केवळ चार दिवसांतच त्याने ७०.७५ कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
‘रेड 2’ लवकरच १०० कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही वाणीच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे.
वाणी कपूर म्हणाली, “बॉक्स ऑफिसवर यश मिळणं हे कलाकारासाठी स्वप्नासारखं असतं. ‘रेड 2’ ला मिळणारा प्रतिसाद अतिशय प्रेरणादायी आहे. प्रेक्षकांच्या हृदयाशी चित्रपट जोडला जात आहे, यापेक्षा मोठं समाधान नाही.”
तिने पुढे दिग्दर्शक आणि सहकलाकारांचे आभार मानताना सांगितले, “राज कुमार गुप्ता सरांसोबत काम करणं ही एक समृद्ध अनुभवाची शाळा होती. अजय सरांसोबत स्क्रीन शेअर करणं हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या यशामुळे माझ्यावर आणखी जबाबदारी आहे आणि प्रेक्षकांसाठी दर्जेदार काम करत राहण्याची प्रेरणा मिळते.”
‘रेड 2’ (Vaani Kapoor Raid 2) चा विषय आणि कथा या दोन्ही बाबतीत प्रेक्षकांशी थेट संवाद साधत असल्याने चित्रपटाला इतका मोठा प्रतिसाद मिळत आहे. वाणी कपूरसाठी हा चित्रपट एक टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
[…] […]
[…] teaser release date यशराज फिल्म्स (YRF) पुन्हा एकदा प्रेमकथांच्या दुनियेत नवा अध्याय लिहिण्यास सज्ज […]