‘रामायण’ मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन
मुंबई – दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका’रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ८२ वर्षांचेहोते.अरविंद त्रिवेदी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते दीर्घ काळापासून आजारी होते,काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारीच होते.काल मंगळवारी रात्री उशिरा त्यांना ह्यदयविकाराचा इटका आला. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र त्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले आणि मंगळवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली.
गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवातकेली.अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला.त्यांचे बंधू उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली, तिथे त्यांनी जवळपास ४० वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.
अरविंद त्रिवेदींनी जवळपास ३०० हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते १९९१ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते.
अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाने हिंदी तसेच गुजराती सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.