ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

0

मुंबई –ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.नुकताच ३० जानेवारीला रमेश देव यांचा वाढदिवस झाला होता.त्यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी दिली.

रमेश देव त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ ला कोल्हापुर येथे झाला.’आनंद’ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. १९५६ साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. तर आरती हा त्यांचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता.रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी पैशाचा पाऊस आणि भाग्यलक्ष्मी या चित्रपटांत काम केले.

रमेश देव यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले.१९६२ मध्ये अभिनेत्री सीमा देव (नलिनी सराफ) यांच्यासोबत लग्न केले. रमेश देव आणि सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले.

या वर्षी रमेश देव आणि सीमा देव हि जोडी आपल्या लग्नाचे ५९ वर्षे पूर्ण करणार होतं. मात्र रमेश देव यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांसन मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती.

एक चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांमध्ये पसरली आहे. त्यांच्या निधनानं एक पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रमेश देव यांच्या चाहत्यांसह दिग्गजांनी व्यक्त केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला -छगन भुजबळ

जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आपले संपूर्ण आयुष्य फक्त अभिनयासाठी वाहीले. देव यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर काही दशके अधिराज्य गाजवले त्यामुळे त्यांच्या जाण्याने अभिनयातला देव हरपला आहे.आज चित्रपटसृष्टीतील एक देखणा तारा निखळला आहे. उत्साहाचा झरा असणाऱ्या नायकाला आज आपण मुकलो अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकभावना व्यक्त करताना मंत्री भुजबळ म्हणतात की , वयाच्या नव्वदीतही काम करण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे त्यांची अभिनयाप्रति असलेली निष्ठा दिसून येते. रमेश देव यांच्या निधनाने अभिनयातला ” देव “आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने देव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय देव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.