ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन :रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

0

 मुंबई,दि. १२ मे २०२४ –अनेक मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचे निधन झालं आहे.रंभूमीवरच त्यांना देवाज्ञा झाली.सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते.सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.अशी माहिती त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी दिली.त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

सतीश जोशी अनेक मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले.त्यांची झी मराठी वाहिनीवरील भाग्यलक्ष्मी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती.त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली आणि त्यांची ही भूमिका गाजली देखील. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक नाटकांमधून आणि सिनेमांमधूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

चाहत्यांनी देखील सतीश जोशी यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.त्यामध्ये त्यांनी म्हटलं की’आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.