ज्येष्ठ अभिनेत्री आणि ख्यातनाम निवेदिका तबस्सुम यांचं निधन 

0

मुंबई,१९ नोव्हेंबर २०२२ – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि ख्यातनाम निवेदिका तबस्सुम गोविल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

शुक्रवारी रात्री ८.४० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्या पूर्णपणे निरोगी होत्या. आम्ही आमच्या शोसाठी १० दिवसांपूर्वी शूटिंग केले आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा शूट करणार होतो. हे सर्वच अचानक घडले, अशी प्रतिक्रिया होशांग यांनी दिली.

तबस्सुम यांचा मुलगा होशांग गोविल याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या जाण्याने कुटुंबासह हिंदी चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे,

तबस्सुम गोविल यांनी लहान वयातच इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. कमी वयातच त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्यांनी ४० आणि ५० च्या दशकात बालकलाकार म्हणूनही अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात ‘बहार’ आणि ‘जोगन’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तबस्सुम यांनी दूरदर्शनवर प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन केले होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.