मुंबई,दि,४ एप्रिल २०२५ – ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते,दिग्दर्शक मनोजकुमार यांचं आज सकाळी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.मनोज कुमार यांना भारत कुमार या नावाने ओळखले जात होते. त्यांनी अनेक चित्रपटांतून काम केले होते ज्यातून त्यांनी देशभक्ती जागवली. त्यांनी हे टोपणनावही आयुष्यभर जपले.
भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज शुक्रवारी, ४ एप्रिल २०२५ रोजी निधन झालं. मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांमुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून ओळख मिळाली. हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तम चित्रपट देणारे बॉलिवूडचे सुपरस्टार मनोज कुमार यांनी आपल्या चित्रपटांमधून लोकांना पडद्यावर देशभक्तीची खोल भावना अनुभवायला लावली. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे.
Legendary actor Manoj Kumar passes away at 87
Read @ANI Story | https://t.co/93JMIfKDc2#ManojKumar #actor #Mumbai pic.twitter.com/iBKAvneYQ7
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2025
बऱ्याचदा, मोठे कलाकार शूटिंग सुरू होण्याच्या थोड्या वेळापूर्वीच सेटवर पोहोचायचे. सेटवर नायकावर प्रकाश कसा पडेल हे तपासण्यासाठी, मनोज कुमारला यांना नायकाच्या जागी उभं करायला लावण्यात आलं. एके दिवशी ते असेच उभा होते आणि त्यांचा चेहरा प्रकाशात इतका आकर्षक दिसत होता की, दिग्दर्शकाने त्यांना एक छोटीशी भूमिका दिली. १९५७ च्या फॅशन चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. येथून त्यांचा चित्रपटांमधील प्रवास सुरू झाला. यानंतर, मनोज कुमार यांना सलग दोन चित्रपट मिळू लागले आणि ते एक प्रसिद्ध चेहरा बनले.
मनोज कुमार यांना १९१९ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मनोज कुमार यांचा राजा खोसला यांचा १९६४ मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.
दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचा जन्म ब्रिटिश भारताच्या वायव्य प्रांतातील (सध्या खैबर पख्तूनख्वा, पाकिस्तान) अबोटाबादमधील एका पंजाही हिंदू ब्राम्हण कुटुंबात झालेला. मनोज कुमार यांंचं खरं नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी. फाळणीनंतर मनोज कुमार १० वर्षांचे असताना त्यांचं कुटुंब जंदियाला शेरखान इशून दिल्लीला स्थलांतरीत झालं.
मनोज कुमार यांचे गाजलेले चित्रपट
मनोज कुमार यांचे वह कौन थी, पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचं तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केलं होतं.
मनोज कुमार यांनी ‘सहारा’ (१९५८), ‘चांद’ (१९५९) आणि ‘हनीमून’ (१९६०) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर त्यांना ‘कांच की गुडिया’ (१९६१) मिळाला ज्यामध्ये ते पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसले. यानंतर ‘पिया मिलन की आस’ (१९६१), ‘सुहाग सिंदूर’ (१९६१), ‘रेश्मी रुमाल’ (१९६१) हे चित्रपट त्यांनी केले.
१९६२ मध्ये विजय भट्ट यांच्या ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटानं त्यांना सर्वात मोठं यश मिळालं, जो व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला. या चित्रपटात माला सिन्हा होत्या. ‘हरियाली और रास्ता’, ‘शादी’ (१९६२) च्या यशानंतर ‘डॉ. विद्या (१९६२) आणि गृहस्थी (१९६३), या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.