राज्या सह जिल्यातील मतदान यंत्रणा सज्ज : कामकाजासाठी एसटीच्या ९ हजार बस धावणार
बसेस अभावी ग्रामीण प्रवाशांचे हाल :निवडणूक कामकाजानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल !
किरण घायदार
नाशिक,दि,१९ नोव्हेंबर २०२४ –महाराष्ट्रात २० नोव्हेंबर तेजी विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत.राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे ९ हजार बस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत.
राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे. मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली. यासाठी सुमारे ९ हजार २०० एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने ३१ विभागांतून २०० ते ६०० बस आरक्षित केल्या आहेत. पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची, मागणी असून सुमारे ६०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे 511,सोलापूर ४९०, अहमदनगर ४६८, सातारा ४४९, कोल्हापूरमधून ४५३ बसची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटी महामंडळाला दोन दिवसांसाठी प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळतील, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल.
छत्रपती संभाजीनगर (३७४ बस), बीड (२९३), जालना (१९९), लातूर (१७५), नांदेड (२७८), धाराशिव (१८२), परभणी (१७५), मुंबई (२८०), पालघर (२५०), रायगड (२३७), सिंधुदुर्ग (१२६), ठाणे (२४६), नागपूर (२५०), भंडारा (२१९), चंद्रपूर (२१४), गडचिरोली (१०९), वर्धा १०८), बुलडाणा (२६८), यवतमाळ (२६५), अमरावती (२८१), जळगाव (३८९), धुळे (३१८) येथेही मोठ्या प्रमाणात बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनेक विभागात उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे इतर विभागांतून बस मागवून बसची पूर्तता केली जाणार आहे.
५११ बसेस तैनात….
निवडणूक कार्यालयाला सुमारे २ हजार वाहनांची आवश्यकता आहे. यापैकी सुमारे १ हजार सरकारी मालकीची असतील आणि उर्वरित खाजगी वाहने भाड्याने घेतली जातील.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निवडणूक कामांसाठी ५११ बसेसचे वाटप केले आहे आणि या वाहनांचे विधानसभानिहाय वितरण अंतिम करण्यात आले आहे.भारतीय निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या काळात वाहनांची नितांत गरज असते.निवडणूक ड्युटीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान सुमारे ५११ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत नियमित प्रवासी सेवेसाठी मर्यादित संख्येने बसेस सुरू राहतील. शेवटच्या क्षणी मागणी असल्यास अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याची सुद्धा तयारी आहे.
बसेस अभावी ग्रामीण प्रवाशांचे हाल
निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेस नसल्यामुळे गैरसोय झाली होती.वेळेवर बस नसल्याचा फटका प्रवाशांना बसल्याने खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागला.
निवडणूक कामकाजानिमित्त शहरातील वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल !
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम, आणि इगतपुरी-त्र्यंबक मतदारसंघांसाठीची मतमोजणी शहरातील चार केंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेने मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
बुधवारी (ता.२०) ला मतदान तर, मतमोजणी शनिवारी (ता.२३) होणार आहे. तर, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील कन्या शासकीय विद्यालयात होणार आहे.या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक कामकाजानिमित्त मोठ्या प्रमाणात एसटी बस, शासकीय वाहने यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तर, मंगळवारी (ता.१९) विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवर मतदान साहित्यासह इव्हीएम मशिनचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ तसेच, बुधवारी (ता.२०) मतदानानंतर सायंकाळी ४ ते मतदान साहित्य जमा होईपर्यंत शहरातील ठिकठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल केले आहेत. तसेच, शनिवारी (ता.२३) सकाळी ६ ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतूक मार्गात नियोजन केले आहे. वाहनचालकांनी याकाळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन उपायुक्त खांडवी यांनी केले आहे.
मतदारसंघानिहाय वाहतूक मार्गातील बदल:
नाशिक पूर्व १२३ विधानसभा मतदारसंघ (मतमोजणी केंद्र : मीनाताई ठाकरे स्टेडिअम, हिरावाडी)
प्रवेश बंद मार्ग:स्वामिनारायण चौक, मीनाताई ठाकरे स्टेडिअम ते के.के.वाघ कॉलेज. कमलनगर चौक ते मीनाताई ठाकरे स्टेडिअमकडे दोन्ही बाजूकडील मार्ग
पर्यायी मार्ग:सर्व्हिस रोडकरिता उड्डाणपुलाखालील हायवे कमलनगरकडील वाहतूक ही कमलनगर, हिरावाडी, काट्या मारुती चौक मार्गे इतरत्र
नाशिक मध्य १२४ विधानसभा मतदार संघ(मतमोजणी केंद्र : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर)
प्रवेश बंद मार्ग: दादासाहेब गायकवाड नगर ते हिरवे नगर, नासर्डी नदीलगतचा मार्ग
पर्यायी मार्ग: मुंबई नाका, नवशक्ती चौक, नागझी सिग्नल मार्गे इतरत्र
नाशिक पश्चिम १२५ विधानसभा मतदार संघ(मतमोजणी केंद्र : छत्रपती संभाजी स्टेडिअम, सिडको)
प्रवेश बंद मार्ग (शनिवार, ता २३ रोजी पहाटे ४ ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीला प्रवेश बंद):महाले पेट्रोल पंप ते सिंहस्थनगर दुहेरी मार्गावरील वाहतुकीला बंदस्टेट बँक चौक ते रतनसिंह बाबूसिंग परदेशी चौक (सेंट लॉरेन्स शाळा चौक) दुहेरी मार्गावरील वाहतुकीला बंद
पर्यायी मार्ग:
सिंहस्थनगरकडून महाले पेट्रोल पंपाकडे जाण्यासाठी महिंद्रा गेस्ट हाऊससमोरून अश्विननगरमार्गे पाथर्डी फाटा व इतरत्रमहाले पेट्रोलपंपाकडून सिंहस्थनगरकडे जाण्यासाठी गुन्हे शाखा युनिट दोन समोरून अश्विननगर मार्गे इतरत्रपरदेशी चौक (सेंट लॉरेन्स शाळा)कडून पाथर्डी फाट्याकडे जाण्यासाठी सहावी स्कीम, सिडको हॉस्पिटलमार्गे पाथर्डी फाटा व इतरत्र
इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघ(मतमोजणी केंद्र : शासकीय कन्या विद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नाशिक)
प्रवेश बंद मार्ग (शनिवार, २३ तारखेला सकाळी ६ ते मध्यरात्रीपर्यंत) सीबीएस सिग्नल ते मेहेर सिग्नल या दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद
पर्यायी मार्ग:अशोकस्तंभाकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सांगली बँक, शालिमार मार्गेमोडक सिग्नलकडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक मोडक सिग्नल, किटकॅट कॉर्नर चौक, खडकाळी सिग्नल, शालिमार,सांगली बँक सिग्नलमार्गेसांगली बँक सिग्नलकडून मेहेर सिग्नल मार्गे सीबीएसकडे जाणारी वाहतूक सांगली बँक सिग्नल, शालिमार मार्गे इतरत्र….