नाशिकच्या विदीत गुजराथी ची भारतीय बुद्धिबळ संघात निवड

0

मुंबई,दि. २१ सप्टेंबर २०२३ – आशियाई क्रीडा स्पर्धेत तब्बल 13 वर्षांनी बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत नाशिकचा विदीत गुजराथी आणि पुण्यातील ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे यांची भारताच्या बुद्धिबळ संघात निवड झाली आहे.विदीत खेळाडू, तर कुंटे प्रशिक्षक म्हणून भारताच्या संघाबरोबर जातील.

आशियाई क्रीडा स्पर्धेत यापूर्वी २०१० मध्ये बुद्धिबळाचा समावेश करण्यात आला होता. भारत  आणि चीन हे दोन संघ या क्रीडा प्रकारात चॅम्पियन मानले जात आहेत.विदीतसह पी. हरिकृष्णा,आर. प्रग्यानंद, डी, गुकेश, अर्जुन एरिगसी असा भारतीय संघ आहे. विदीत आणि अर्जुन हे सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारांत खेळणार आहेत.

अभिजित कुंटे यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जागतिक सांघिक स्पर्धेत महिला संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. महिला संघ वैयक्तिक जलद आणि सांघिक जलदगती प्रकारात सहभागी होणार आहे. कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका,वैशाली रमेशबाबू, सविता श्री. बी. आणि वंतिका अग्रवाल असा महिला संघ असेल. हम्पी आणि हरिका या वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत खेळणार आहे.

आपली भारतीय संघात निवड झाल्या नंतर विदीत गुजराथी म्हणाला, ‘आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना खूप आनंद होत आहे. स्पर्धेचे स्वरूप मनोरंजक असून वयैक्तिक आणि सांघिक लढती खेळताना कौशल्य पणाला लागेल. कोलकता येथील शिबिरात चांगला सराव झाला आहे. सर्वच खेळाडूंना आता स्पर्धेत खेळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आमच्याकडून अपेक्षा मोठय़ा आहेत. पदक मिळविण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावू.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!