‘नोवा’च्या अध्यक्षपदी विक्रम कदम तर सरचिटणीसपदी सचिन गिते 

नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

0

नाशिक,दि.५ मे २०२३ – नाशिक जिल्हा व शहरातील मनपा अधिकृत परवानाधारक व्यावसायिक जाहिरात फलक मालकांची संघटना ‘नोवा’ अर्थात, नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्काय साइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची तर बिग आय मिडियाचे संचालक इम्तियाज अत्तार यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी श्री साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे संचालक सचिन गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. असोसिएशनच्या गुरूवारी (दि. ५) झालेल्या सभेत दोन वर्षांकरिता नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. जाहिरात फलक व्यवसायातील अडी-अडचणी, भविष्यातील आव्हाने, उपाययोजना व नाशिक महानगरपालिकेने जाहिरात कर व परवाना फिमध्ये केलेली दरवाढ यावर सभेत चर्चा करून व्यावसायिक जाहिरात फलकांच्या जाहिरातीचे सुधारित किमान व कमाल दर निश्चित करण्यात आले.

उर्वरीत कार्यकारिणीत सहचिटणीसपदी साई साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे संचालक महेश गिरमे, खजिनदारपदी सौरभ पब्लिसिटीचे संचालक सौरभ जालोरी, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून रवी शिरसाठ, मनीष नाशिककर, गौरव माटे, निखिल सुराणा, हर्षद कुलथे, यांचा समावेश आहे.

सभेसनंदन दीक्षित, संध्या बस्ते, मच्छिंद्र देशमुख, गणेश बोडके, विष्णुपंत पवार, सोमनाथ पाटील, रमेश गिते, विराज पवार, बंटी धनविजय, छोटू धनविजय, अनुप वझरे, निलेश विसपुते, दीपक पवार, प्रविण खैरे, विराज पवार, निखिल सुराणा, रोहन सुराणा, संजय मालुसरे, संजय अस्वले व नोवाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.